वर्षभर मुस्लिमांच्या नावाने शिमगा अन् निवडणुका आल्या की पुरणपोळी, 'सौगात ए मोदी' वरुन ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली.

Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. ईदच्या निमित्ताने भाजपने सौगात ए मोदी हा कार्यक्रम हाती घेतला आहे. 36 लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी 32 हजार भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन सौगात ए मोदी देणार आहेत. हे काय सौगात ए मोदी नाही तर हे सौगात ए सत्ता असल्याचे वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, याचं एक हे निर्लज्य उदाहरण असल्याचे ठाकरे म्हणाले. ही सोगात ए सत्ता ही बिहारच्या निवडणुकीपूरती राहणार आहे की नंतर सुद्धा राहणार आहे, भाजपनं जाहीर करावं असे ठाकरे म्हणाले.
आमच्यावर आरोप करण्यापूर्वी तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा
महाराष्ट्राच्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे चा नारा देणारे आता भेट द्यायला चालले आहेत, वर्षभर होळीच्या नावाने मुस्लिमांच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणुका आल्या की त्यांना पुरणपुळी द्यायची असे म्हण ठाकरेंनी भाजपवर टीका केली. तुम्ही जो आमच्यावर हिदुंत्व सोडल्याचा आरोप करता तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा असे म्हणत ठाकरेंनी भाजपवर टीका केली. आता यांचं ढोंग उघड पडलं आहे. हिरवा रंग तर ते काढणारच नाहीत असे ठाकरे म्हणाले. निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही अनेक आश्वासनं दिली आहेत. वीज बील माफ असेल, कर्जमाफी असेल, लाडकी बहिण योजना असेल याबाबत काय झालं? सत्ता मिळेपर्यंत यांनी थापा मारल्या आणि आता म्हणतात आम्ही त्या गावचेच नाही असे ठाकरे म्हणाले. अजित पवार यांनी सांगितले की, मी कोणत्या भाषणात मी कर्जमाफीबद्दल बोललो होतो असे म्हणाले.
अस्वस्थ सरकाराने मांडलेला हा निर्थक अर्थसंकल्प
अस्वस्थ सरकाराने मांडलेला हा निर्थक अर्थसंकल्प होता अशी टीका उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली. अपयश लपवणार हे अधिवेशन होतं. 100 दिवसात हे सरकार काय करणार असा संकल्प त्यांनी दिला होता. यातले किती संकल्प पूर्ण केले? एकही संकल्प पूर्ण करण्यात आला नाही असे ठाकरे म्हणाले. हा संकल्प कुठेही दिसला नाही, हे सरकार सत्तेत आल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी हत्या, संतोष देशमुख हत्या स्वारगेट बलात्कार प्रकरण, रस्ते घोटाळा प्रकरण आणि अनेक भ्रष्टाचारची प्रकरण समोर आली असल्याचे उद्दव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री नागपूर दंगलीची सारवासारव करतायेत
शेतकरी कर्जमाफीबद्दल वाच्यता नाही. 2100 रुपये लाडक्या बहिणीला दिले नाहीत. आता त्यात वर्गवारी सुद्धा बहिणींची करण्यात आली आहे. नको ती योजना अशी वेळ त्या बहिणीवर येते की काय? असं त्यांना वाटतं असेल असे ठाकरे म्हणाले. नागपूर दंगलीची सारवासारव मुख्यमंत्री करत आहेत. आजा ज्याला मुख्यमंत्री पदाचे कोंब फुटले होते ते कोंब काही गेले नाहीत. आता मुख्यमंत्र्यांना वाटत असेल की याला एवढ देऊनही असं सुरु आहे. कबरीपासून कामरापर्यंतचे हे अधिवेशन होते असेही ठाकरे म्हणाले. खिशात नाही आणा अन् बाजाराव म्हणा अशी सरकारची अवस्था झाल्याचे ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Eknath Shinde : मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
