Surya Grahan 2025 : शनी अमावस्येला असणार सूर्यग्रहणाचं सावट; 'या' 3 राशींसाठी धोक्याची घंटा, चुकूनही घराबाहेर पडू नका
Surya Grahan 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनी अमावस्येच्या दिवशी वर्षातील पहिलं सूर्यग्रहण (Surya Grahan) लागणार आहे. या सूर्य ग्रहणाच्या दरम्यान राहू-केतूचा प्रभाव पृथ्वीवर वाढतो.

Surya Grahan 2025 : हिंदू धर्मग्रंथात अमावस्या तिथीचं फार महत्त्व आहे. या दिवशी गंगा स्नान करुन भगवान शंकराची (Lord Shiva) पूजा केली जाते. त्याचबरोबर पितराचं तर्पण किंवा पिंडदान केलं जातं. वैदिक पंचांगानुसार, 29 मार्च रोजी चैत्र अमावस्येचा दिवस आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शनी अमावस्येच्या दिवशी वर्षातील पहिलं सूर्यग्रहण (Surya Grahan) लागणार आहे. या सूर्य ग्रहणाच्या दरम्यान राहू-केतूचा प्रभाव पृथ्वीवर वाढतो. त्यामुळे ग्रहणाच्या दिवशी शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते.
सूर्य ग्रहण 2025 (Surya Grahan 2025)
ज्योतिष शास्त्रानुसार, 29 मार्च रोजी वर्षातील पहिलं सूर्य ग्रहण लागणार आहे. मात्र हे सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही. 2025 वर्षातील पहिलं सूर्यग्रहण चैत्र अमावस्येच्या दिवशी भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, संध्याकाळी 6 वाजून 16 मिनिटांनी समाप्त होणार आहे.
मेष रास (Aries Horoscope)
सूर्यग्रहाच्या वेळी मेष राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. या काळात कोणतंही शुभ कार्य करु नये. तसचे, कोणत्याच प्रकारची गुंतवणूक करु नका. कोणताच महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. तसेच, तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. या राशीच्या लोकांना देखील ग्रहण काळात सांभाळून राहण्याची गरज आहे. त्यामुळे कोणतंच शुभ कार्य करु नका. तसेच, या दिवशी गरज असल्यास तरच घराबाहेर पडा. ग्रहणाच्या कालावधीत महामृत्यूंजय मंत्राचा जप करा. तसेच, दूरचा प्रवास करणं टाळा.
मीन रास (Pisces Horoscope)
सध्याच्या काळात सूर्य आणि राहू मीन राशीत विराजमान आहे. सूर्य आणि राहू यांच्यात शत्रूत्वाचं नातं आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी फार आव्हानात्मक असू शकतो. त्यामुळे या काळात कोणताही निर्णय घेताना भावनेच्या भरात घेऊ नका. यामुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















