प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने 5 व्या बाळाचं नामकरण केलं, श्रीकृष्णाशी निगडीत ठेवलं नाव
Seema Haider and Sachin Meena : प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने 5 व्या मुलाचं बारसं उरकलं, श्रीकृष्णाशी निगडीत ठेवलं नाव

Seema Haider and Sachin Meena : दोन वर्षांपूर्वी प्रेमासाठी पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आलेली सीमा हैदर काही दिवसांपूर्वी पाचव्यांदा आई झाली. सीमाने तिचा प्रियकर असलेल्या सचिनच्या मुलाला जन्म दिलाय. विशेष म्हणजे भारतात येताना ती तिच्या 4 मुलांना घेऊन आली होती. आता सीमा आणि सचिन यांनी त्यांच्या बाळाचं नामकरण केलंय. स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या सीमाने बाळाचं नाव श्रीकृष्णाच्या नावाशी निगडित असं ठेवलंय. सचिन आणि सीमाने त्यांच्या बाळाचं नाव 'मीरा', असं ठेवलंय. दरम्यान, अजून बाळाच्या नामकरणाचा कार्यक्रम झालेला नाही.
सीमाने पाकिस्तानातून आणलेल्या बाळांचं नावही बदलललं
सीमा आणि सचिनने (Seema Haider and Sachin Meena) एका युट्युब व्हिडीओमध्ये सांगितलं की, त्यांनी त्यांच्या बाळाचं नाव मीरा ठेवलंय. आपल्या बाळाला प्रेमाने हाक मारण्यासाठी त्यांनी हे नाव ठेवलंय. सीमा हैदरने प्रेमासाठी भारतात आल्यानंतर स्वत: हिंदू असल्याचं सांगत असून तिने तिच्या बाळांचं नाव देखील बदललं आहे. मात्र, सीमाने स्वत:चं नाव बदललेलं नाही.
पबजी खेळत असताना प्रेम झालं आणि पाकिस्तानातून भारतात आली
सीमा हैदर हिने 2023 मध्ये भारतात अवैधरित्या भारतात घुसखोरी केली होती. पबजी गेम खेळत असताना सीमाचा सचिनवर जीव जडला होता. पबजीमुळे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सीमा विना व्हिसा आणि पासपोर्ट नेपाळमार्गे भारतात आली होती. दरम्यान, तिच्याबाबत माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली होती. सध्या ती जामीनावर बाहेर आहे. सीमा हैदरचा दावा आहे की, मी सचिनसोबत विवाह केलाय आणि आता आयुष्यभर भारतात राहाणार आहे. सीमा हैदरच्या चार मुलांच्या नागरिकतेचा प्रश्न देखील कायम आहे.
सीमा पाचव्यांदा आई झाल्यानंतर पाकिस्तानातील पती भडकला
दरम्यान, सीमा भारतात आल्यानंतर तिचा पाकिस्तानातील पती गुलाम हैदर त्याच्या मुलांना परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहे. सीमा पाचव्यांदा आई झाल्यानंतर गुलाम हैदर संतापलेला पाहायला मिळाला होता. गुलाम रोज युट्युबवर व्हिडीओ टाकून तिच्यावरचा राग व्यक्त करत असतो. शिवाय, तो मुलांना परत मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
