एक्स्प्लोर
success story : बुद्धी आणि सौंदर्याचा अनोखा मिलाप; कुठल्याही कोचिंगशिवाय IAS झालेल्या सर्जनाची प्रेरणादायी कहाणी
यूपीएससी पास होणं अनेकांचं ध्येय असतं. अनेकजण या परीक्षेची तयारी करतात मात्र काहींनाच यात यश मिळतं. काहींच्या स्टोरी खूप प्रभावी असतात यातलंच एक नाव दिल्लीच्या सर्जना यादव (IAS Sarjana Yadav )यांचं

IAS Sarjana Yadav Story upsc ias
1/10

IAS Sarjana Yadav success story : आपल्या देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे UPSC. यूपीएससी पास (UPSC Latest Update) होणं अनेकांचं ध्येय असतं.
2/10

अनेकजण दरवर्षी या परीक्षेची तयारी करतात मात्र काहींनाच यात यश मिळतं. यातील काहींच्या स्टोरी खूप प्रभावी आणि प्रेरणादायी असतात. यातलंच एक नाव आहे दिल्लीच्या सर्जना यादव (IAS Sarjana Yadav )यांचं. दिल्लीच्या सर्जना यादव यांची खासियत म्हणजे त्यांनी कुठल्याही कोचिंगशिवाय ही नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयएएस (UPSC Exam) अधिकारी बनल्या. त्या दिसायला जितक्या सुंदर आहेत तितक्याच प्रतिभावान देखील आहेत. एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल असं त्यांचं सौंदर्य आहे.
3/10

दिल्लीच्या सर्जना यादव यांनी या UPSC परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग क्लासेसचे तोंडही पाहिले नाही. त्यांनी सेल्फ स्टडी करुन यश संपादित केलं.
4/10

आपला अभ्यास करणं आपल्या हातात असतं. जर आपल्याकडे अभ्यासासाठी पुरेसं साहित्य असेल आणि आपलं नियोजन परफेक्ट असेल तर आपल्याला यश मिळवण्यापासून कुणी रोखू शकणार नाही, असं सर्जना म्हणतात.
5/10

सर्जना यादव आधी खाजगी कंपनीत नोकरी करत होत्या. त्यासोबतच यूपीएससीची तयारी करत होती. पहिल्या दोन वेळा त्यांनी परीक्षा दिली पण त्यांना यश मिळाले नाही.
6/10

परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकल्याची खंत त्यांना होती. मी हार मानली नाही आणि प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकले, असं सर्जना सांगतात.
7/10

संजना पूर्णवेळ खाजगी कंपनीत काम करायच्या, त्यामुळे अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकत नव्हत्या.
8/10

त्यानंतर 2018 मध्ये तिसऱ्या प्रयत्नापूर्वी त्यांनी नोकरी सोडली आणि अधिक मेहनत घेऊन परीक्षेची तयारी सुरू केली अन् सेल्फ स्टडी करत यश मिळवलं.
9/10

2019 मध्ये सर्जना यादव यांनी घवघवीत यश मिळवत ऑल इंडिया रॅंक 126 मिळवत IAS होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. कोणत्याही विषयाचा अर्ध्या मनाने अभ्यास करू नये, तर सखोल अभ्यास करावा. तुमच्या क्षमतेनुसार रणनीती बनवा.
10/10

तयारीसाठी दिवसातील तास निश्चित करा आणि नंतर त्यावर लक्ष केंद्रित करून अभ्यास करा. अभ्यासक्रम संपल्यानंतर अधिकाधिक उजळणी आणि लेखनाचा सराव केल्यास नक्कीच यश मिळेल, असं सर्जना यादव सांगतात.
Published at : 02 Jan 2023 04:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
जळगाव
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion