20 विद्यार्थ्यांना फासावर लटकवणार, भारताशेजारील देशाचं टोकाचं पाऊल, नेमकं प्रकरण काय?
Bangladesh News : बांगलादेशातील उच्च न्यायालयाने 20 विद्यार्थ्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.

Bangladesh News : बांगलादेशात 2019 मध्ये झालेल्या हत्या प्रकरणाती ढाका उच्च न्यायालयाने 20 विद्यार्थ्यांना सुनावण्यात आलेली मृत्यूदंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. या विद्यार्थ्यांनी त्यांचा सहकारी असलेल्या अबरार फहद याची मारहाण करुन हत्या केल्याचा आरोप होता. याप्रकरणी ते दोषी आढळले आहेत. फहदने शेख हसीना सरकारविरोधात फेसबुक पोस्ट केली आहे. त्यानंतर अवामी लीगच्या विद्यार्थी संघटनेने कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण करुन त्याची हत्या केली होती. 2021 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने सर्व आरोपी दोषी असल्याचे म्हणत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. आता हायकोर्टाने तो निर्णय कायम ठेवलाय.
शिक्षा सुनावण्यात आलेले विद्यार्थी हसीना शेख यांच्या विद्यार्थी संघटनेचे
ढाका उच्च न्यायालयाने 20 विद्यार्थ्यांना फाशी शिक्षा सुनावली आहे, सोबतच इतर पाच विद्यार्थ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. फहदच्या कुटुंबियांना न्यायालयाच्या या निर्णयावर समाधान व्यक्त केले. मात्र, आरोपींची वकिल आता वरिष्ठ न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगत आहेत. दरम्यान, या प्रकरणात दोषी असलेला मुंतसिर सध्या जेलमधून फरार झाला. हत्याप्रकरणातील सर्व दोषी बांग्लादेश युनिव्हर्सिटी ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजीशी संबंधित आहेत.
बांगलादेशातील विद्यार्थ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर या प्रकरणाला राजकीय रंग प्राप्त झालाय. कारण दोषी आढळलेले सर्व विद्यार्थी बांग्लादेश छात्र लीगचे सदस्य आहेत. बांग्लादेश छात्र लीग ही माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीगची एक शाखा आहे. फहदने फेसबुक पोस्टमधून शेख हसीना सरकारवर टीका केली होती. त्यानंतर बांग्लादेश छात्र लीगचे विद्यार्थी नाराज झाले होत, त्यांनी त्याच्यावर हल्ला केला होता. दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते.
कनिष्ठ न्यायालयाने सुनावली होती फाशी
ढाकातील एका कनिष्ठ न्यायालयाने दोषींना डिसेंबर 2021 मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. त्यावेळी बांगलादेशात शेख हसीना यांच्या आवामी लीगचं सरकार होतं. यातील इतर पाच दोषींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलीहोती. आता हायकोर्टातील न्यायमुर्ती सदुज्जमान आणि जस्टिस सैयद एनायत हुसैन यांच्या खंडपीठाने कायम ठेवलीये. खंडपीठाने म्हटलं की, हायकोर्टाच्या निर्णयाबाबत आम्ही संतुष्ठ आहोत. फहदचा भाऊ फैय्याजने म्हटलं की, एवढ्या लवकर हायकोर्ट हा निर्णय देईल अशी अपेक्षा नव्हती. मात्र या निर्णयामुळे आम्ही समाधानी आहोत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

