एक्स्प्लोर
TCS and Infosys Salary Hike: इन्फोसिस, TCS कंपनीच्या कर्मचाऱ्यांना झटका, यंदा कमी पगारवाढ, बोनसही तुटपुंजा?
salary hike TCS: टीसीएस आणि इन्फोसिस या भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये होणाऱ्या पगारवाढीनुसार इतर कंपन्यांमध्ये पगारवाढीचा पॅटर्न ठरतो.
salary hike
1/7

भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्या टीसीएस आणि इन्फोसिसकडून आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी इन्फोसिसने म्हैसूर कॅम्पसमधील 3000 पेक्षा जास्त फ्रेशर्सना कामावरून काढले होते.
2/7

गेल्या काही दिवसांत भांडवली बाजारात मोठी पडझड झाली आहे. आयटी कंपन्यांच्या शेअर्सचा भाव कोसळल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील आयटी क्षेत्र (IT sector) पुन्हा एकदा दबावाखाली असल्याचे दिसत असून, त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावरही दिसून येणार आहे.
3/7

TCS कंपनीकडून यंदा कर्मचाऱ्यांना फक्त 4 ते 8 टक्के पगारवाढ दिली जाईल, अशी माहिती आहे.
4/7

Infosys कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा अवघी 5 ते 8 टक्के पगारवाढ मिळणार आहे. त्यामुळे यंदा कर्मचाऱ्यांच्या हातात कमी पैसे पडतील.
5/7

टाटा कन्सल्टसी सर्व्हिसेस अर्थात TCS कंपनीने कर्मचाऱ्यांना दरवर्षी देण्यात येणाऱ्या व्हेरिएबल पे (Variable Pay) बाबत महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यानुसार कनिष्ठ आणि मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांना यंदा 100 टक्के व्हेरिएबल पे मिळेल. तर वरिष्ठ कर्मचाऱ्यांना अवघे 20 ते 40 टक्के इतका व्हेरिएबल पे मिळू शकतो, अशी माहिती आहे.
6/7

TCS कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्येही यंदा कपात होऊ शकते.
7/7

यंदाची पगारवाढ TCS कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी गेल्या चार वर्षातील सर्वात कमी पगारवाढ ठरण्याची शक्यता आहे.
Published at : 07 Mar 2025 08:50 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक























