एक्स्प्लोर
Health Tips : 80 वर्षांहून अधिक जगायचे आहे? फाॅलो करा 'या' काही टिप्स
जर आपण लहानपणापासूनच आपल्या काही चांगल्या सवयी नियमित ठेवल्या आणि वाईट सवयींपासून दूर राहिलो, तर तुम्ही खूप काळ जगू शकता. त्याकरता काही टिप्स फाॅलो करणं गरजेचे आहे.
Health Tips
1/10

आपले पण आयुष्य खूप असावे, असे कोणाला वाटत नाही. तर भरपूर आयुष्य तुम्हाला देखील मिळू शकते. पण याकरता तुम्हाला काही चांगल्या सवयी अंगी बाळगणे गरजेचे आहे. त्यामुळे जास्त आयुष्य जगण्याची शक्यता वाढते.
2/10

एका अभ्यासात असे आढळून आले आहे की लोकांमध्ये कोर्टिसोलची पातळी जितकी कमी असेल तितके ते जास्त काळ जगतील. जेव्हा जास्त ताण येतो तेव्हा हा हार्मोन वाढतो. त्यामुळे कधीही तणाव घेऊ नका. मैत्रिणी - मित्रांसोबत आनंदी रहा.
3/10

जर तुम्ही दररोज 40 मिनिटे वेगाने चालत असाल किंवा धावत असाल तर तुमचे आयुष्य निश्चितच जास्त असेल. कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनात असे आढळून आले आहे की जे लोक आठवड्यातून सुमारे 5 तास धावतात ते 80 वर्षांपेक्षा जास्त जगण्याची शक्यता असते.
4/10

नेदरलँडमधील एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक दररोज 30 ते 35 ग्रॅम आहारात फायबर घेतात त्यांना हृदय आणि मधूमेह संबंधित अनेक आजारांचा धोका कमी होतो.
5/10

एखादी महिला जितक्या उशिरा गर्भवती होईल तितकेच ती जास्त काळ जगेल. उदाहरण म्हणजे जर एखाद्या महिलेला 44 व्या वर्षी मुल झाले तर ती महिला ज्या महिलेस वयाच्या 40 व्या वर्षी मुल झाले आहे, तिच्यापेक्षा जास्त जगते.
6/10

जर तुमचा पल्स रेट 60 बीट्स प्रति मिनिट असेल तर तुमची जगण्याची शक्यता खूप जास्त आहे. सामान्य पल्स रेट 60 ते 100 च्या दरम्यान असतो. पण कमी पल्स रेट म्हणजे तुमच्या हृदयाला जास्त त्रास होत नाही. जर तुम्हाला रक्तदाब नसेल तरच हे शक्य आहे.
7/10

सामान्य व्यक्तीसाठी रात्रीची 7 ते 8 तासांची झोप खूप महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत झोपेचे आणि उठण्याचे नियम ठरवा आणि त्याचे पालन करा.
8/10

तुम्ही तुमच्या आहारातून कॅफीन आणि अल्कोहोल कमी करणे महत्त्वाचे आहे. चहा आणि कॉफीमध्ये निकोटीन आणि कॅफीन असते, तर अल्कोहोलचे जास्त सेवन केल्याने तुमच्या किडनीवर परिणाम होऊ शकतो.
9/10

स्वतःला शक्य तितके सक्रिय ठेवा. तुम्ही शारीरिकदृष्ट्या खूप सक्रिय राहिल्यास तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी आणि मजबूत राहील. तुम्हाला चांगली झोपही मिळेल आणि तणाव कमी करता येईल.
10/10

आनंदी राहणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत, सामाजिकरित्या सक्रिय रहा आणि आपल्या आनंदाचा शोध घ्या.
Published at : 29 Sep 2023 02:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
निवडणूक
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
