एक्स्प्लोर

Suryakumar Yadav Ranji Trophy : रोहितनंतर सूर्याच्या बॅटलाही ग्रहण; नॉकआऊट सामन्यात मुंबईची अवस्था बिकट, रणजीत मोठा उलटफेर

रणजी ट्रॉफी सध्या भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये खेळली जात आहे. गट फेरीनंतर आता उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू झाले आहेत.

Mumbai vs Haryana Ranji Trophy quarter Final  : रणजी ट्रॉफी सध्या भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये खेळली जात आहे. गट फेरीनंतर आता उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू झाले आहेत. मुंबई संघाचा सामना क्वार्टर फायनलमध्ये हरियाणाशी खेळत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि अवघ्या काही षटकांतच मुंबईचे स्टार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यामुळे रणजीत मोठा उलटफेर पाहिला मिळत आहे.

भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव एकदिवसीय संघातून बाहेर आहे. त्याने 2023 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. त्याच वेळी, तो टी-20 स्वरूपात काही खास कामगिरी करू शकला नाही. आता सूर्या मुंबईकडून रणजी ट्रॉफी 2025 चा क्वार्टर फायनल सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. 

पण सूर्यकुमार यादव या सामन्याच्या पहिल्या डावात पूर्णपणे अपयशी ठरला. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर मुंबईने या डावातील पहिली विकेट गमावली. आयुष म्हात्रे खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, दुसरा सलामीवीर आकाश आनंद जास्त काळ क्रीजवर टिकू शकला नाही, त्याने 21 चेंडूत 10 धावा काढल्यानंतर आपली विकेट गमावली.

यानंतर मुंबई संघाला सिद्धेश लाडच्या रूपाने चौथा धक्का बसला. सिद्धेश लाडनेही 15 चेंडूंचा सामना केला आणि त्याला फक्त 4 धावा करता आल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला, पण सूर्यालाही काही खास करता आले नाही. तो फक्त 9 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. यादरम्यान त्याने 2 चौकार मारले. मुंबई संघाने मोठ्या सामन्यात आपले पहिले 4 विकेट फक्त 25 धावांत गमावले.

गेल्या 10 डावांमध्ये सूर्या ठरला अपयशी  

सूर्यकुमार यादवच्या गेल्या 10 डावांवर नजर टाकली तर, तो सतत अपयशी ठरत आहे. सूर्याने भारतासाठी पाच टी-20 सामने खेळले. या काळात तो दोनदा शून्यावर बाद झाला. एकदा तो 2 धावा काढून बाद झाला होता. राजकोटमध्ये 14 आणि चेन्नईमध्ये 12 धावा केल्यानंतर तो बाद झाला. गेल्या पाच सामन्यांमध्ये सूर्याने मुंबईसाठी काही खास कामगिरी केलेली नाही. गेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी कर्नाटकविरुद्ध 20 धावा केल्यानंतर तो बाद झाला होता. यानंतर, 23 डिसेंबर रोजी, हैदराबादविरुद्ध 18 धावा करून तो बाद झाला. पंजाब आणि पुद्दुचेरीविरुद्ध खातेही उघडू शकले नाही.

सूर्याने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 81 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 77 डावांमध्ये त्याने 39.33 च्या सरासरीने आणि 167.70 च्या स्ट्राईक रेटने 2596 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 4 शतके आणि 21 अर्धशतके झळकावली आहेत.

हे ही वाचा -

Team India : बीसीसीआयचा नवा फॉर्म्युला! 3 फॉरमॅटमध्ये 3 कर्णधार; 'किंग कोहली' कसोटीत करणार संघाचे नेतृत्व? हार्दिक पांड्याही शर्यतीत

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Embed widget