एक्स्प्लोर

Pune News : जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन लेकरांना पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारले, नवऱ्यावरही कोयत्याने वार; पुणे जिल्ह्यातील थरकाप

Pune News : दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली. पती-पत्नीच्या वादातून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.

Pune News : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात अत्यंत थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पोटच्या दोन चिमुरड्या लेकरांना आईनेचे पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारल्याची घटना घडली. या क्रूर महिलेने आपल्या पतीवर देखील कोयत्याने वार केले. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली. पती-पत्नीच्या वादातून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. आज (8 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. दौंड पोलिसांनी आरोपी कोमल दुर्योधन मिढे या 30 वर्षीय महिलेला ताब्यात घेतलं आहे. शंभू दुर्योधन मीढे (वय 1 वर्ष) आणि पियू दुर्योधन मीढे (वय 3 वर्ष) अशी मयत मुलांची नावे आहेत. या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मीढे (वय 35 वर्ष)  याच्यावरही कोयत्याने मानेवर व हातावर वार करून जखमी केलं आहे. 

तीन अल्पवयीन मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना 

दरम्यान, तरुणांमध्ये मोबाईल वापर आणि सोशल मीडियाचे व्यसन इतके वाढत आहे की अल्पवयीन मुले-मुली सर्व मर्यादा ओलांडत आहेत. मुंबईतील अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत तीन अल्पवयीन मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका मुलीने सतत मोबाईल फोन वापरल्याने वडिलांनी शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात घर सोडले. घरातून बाहेर पडताना तरुणीने दोन मैत्रिणींनाही सोबत घेतले. तिन्ही मुली 7 व्या वर्गात शिकतात. तिन्ही मुली 14 वर्षांच्या आहेत. तीन मुली घरातून पळून गेल्याच्या वृत्ताने परिसरात खळबळ उडाली.

मुंबई पोलिसांना चार तासांत मुली सापडल्या

मुलीच्या पालकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत एमआयडीसी पोलिसांनी तपासासाठी स्वतंत्र पथके तयार करून सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे मुलींचा शोध सुरू केला. पोलिसांना तांत्रिक माहितीच्या आधारे मुली अंधेरीहून दादर रेल्वे स्थानकाच्या दिशेने गेल्याचा सुगावा लागला. या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी अवघ्या चार तासांत मुलींचा शोध घेतला. एमआयडीसी पोलिसांनी या मुलींना दादर रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. घरातून पळून गेलेल्या मुलींच्या पालकांनी अवघ्या चार तासांत मुली शोधून काढल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले.  

इतर महत्वाच्या बातम्या 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Nasrapur Crime: अत्याचार करताना 4 ते 5 मुलांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने समोर दगड भिरकावला; नसरापूर प्रकरणातला सगळ्यात मोठा पुरावा, नेमकं काय घडलं?
अत्याचार करताना 4 ते 5 मुलांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने समोर दगड भिरकावला; नसरापूर प्रकरणातला सगळ्यात मोठा पुरावा, नेमकं काय घडलं?
Pune Nasrapur Girl Death Case: नसरापूर अत्याचार प्रकरणी कोर्टात न्यायाधीशांचा एकच प्रश्न; आरोपी म्हणाला...
नसरापूर अत्याचार प्रकरणी कोर्टात न्यायाधीशांचा एकच प्रश्न; आरोपी म्हणाला...
Pune IMD News: पुढील तीन दिवस उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये उच्चांकी तापमान वाढणार, राज्यात उष्माघाताचा धोका वाढला, हवामान विभागाने दिला इशारा
पुढील तीन दिवस उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये उच्चांकी तापमान वाढणार, राज्यात उष्माघाताचा धोका वाढला, हवामान विभागाने दिला इशारा
Pune Crime : कुटुंबीयांची स्वारगेट पोलिसांकडे 'मिसिंग'ची तक्रार अन् हॉटेलमध्ये उद्योजकाचा मृतदेह आढळला; सोबत चिठ्ठीही मिळाली, पुण्यात नेमकं काय घडलं?
कुटुंबीयांची स्वारगेट पोलिसांकडे 'मिसिंग'ची तक्रार अन् हॉटेलमध्ये उद्योजकाचा मृतदेह आढळला; सोबत चिठ्ठीही मिळाली, पुण्यात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
Embed widget