एक्स्प्लोर
Gold Rate Today : नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या दराने गाठली उच्चांक पातळी; वाचा आजचे दर
Gold Rate Today : नवीन वर्ष 2023 ला सुरुवात झाली आहे. वर्षाच्या सुरूवातीलाच गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झालेली आहे.

Gold Rate Today
1/10

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चीनमधील कोरोना संसर्गाने दहशत निर्माण केली आहे. एकीकडे कोरोनाचं संकट तर दुसरीकडे जागतिक पातळीवरील डॉलरच्या संख्येत झालेली वाढ यामुळे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ पाहायला मिळतेय.
2/10

भारतात लग्नसराईचादेखील सीझन सुरु आहे. अशातच सोन्याची वाढती किंमत ग्राहकांना न परवडणारी आहे.
3/10

आज बुलियन्सच्या रिपोर्टनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 55,880 रूपयांवर व्यवहार करत आहे.
4/10

तर, आज एक किलो चांदीचा दर 69,340 रूपयांवर व्यवहार करत आहे.
5/10

सोन्या-चांदीचे हे वाढलेले दर मुंबईसह, पुणे, नाशिक, नागपूर, आणि कोलकाता दिल्लीसह अन्य शहरांमध्येही कमी-जास्त प्रमाणात व्यवहार करत असतात.
6/10

सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याच्या दरात गेल्या चोवीस तासांत 900 रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचे दर हे जीएसटीसह 58,000 हजार रुपये इतक्या उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत.
7/10

जागतिक बाजारातील मौल्यवान धातूंची किंमत पाहता स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.5% वाढून $1,886.70 प्रति औंस झाले.
8/10

US सोने फ्युचर्स 0.8% कमी होऊन $1,796.55 वर होते. स्पॉट सिल्व्हर 0.8% कमी होऊन $23.46 वर, प्लॅटिनम 0.5% कमी होऊन $1,006.88 वर आणि पॅलेडियम 0.3% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत.
9/10

सोन्याच्या वाढलेल्या दरामुळे काही ग्राहकांनी वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.
10/10

इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
Published at : 05 Jan 2023 12:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
