एक्स्प्लोर
यशोगाथा! तीन एकरात तब्बल 24 लाख रुपयांच्या पेरूचं उत्पादन
Farmer Success Stories : दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील एका शिक्षक असलेल्या शेतकऱ्यांने तीन एकरात तब्बल 24 लाख रुपयांच्या पेरूचं उत्पादन घेतलं आहे.

Production of guava worth 24 lakh in three acres
1/10

वाघोली येथील राजेंद्र मगर शिक्षक म्हणून सेवा बजावतात. सुटीत ते शेतीत नवनवे प्रयोग करत असतात.
2/10

मगर यांनी अडीच वर्षापूर्वी मोहोळ येथील एका शेतकऱ्याकडे व्हीएनआर जातीच्या पेरूची बाग पाहिली. पेरू लागवडीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे पाहून त्यांनी रायपूर (छत्तीसगड) येथून दीड हजार रोपे आणले.
3/10

यावेळी त्यांनी तीन एकर शेतामध्ये 1475 रोपं लावली. यावेळी त्यांना एका रोपसाठी 200 रुपये खर्च आला.
4/10

ठिबकमधून प्रत्येक सात दिवसाला औषधी देण्यात आली. सोबतच झाडांवर फवारणी करण्यात आली. या सर्वांसाठी एक वेळापत्रक तयार करण्यात आला होता.
5/10

झाडांना लागणाऱ्या फळांचं वजन वाढल्यास ते वजन सहन करणार नाही म्हणून यासाठी लोखंडी पाईपलावून फाउंडेशन केले. यासाठी त्यांना 5 लाखांचा खर्च आला.
6/10

त्यानंतर मे 2023 मध्ये त्यांनी फळ लागवडीसाठी छाटणी केली आणि 15 ऑक्टोबरपासून फळधारणेला सुरुवात झाली.
7/10

ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत तीन एकरात 33 टन फळांतून 24 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
8/10

मगर यांचे पेरू सांगली येथील व्यापाऱ्यामार्फत केरळच्या बाजारपेठेत विक्रीस गेले आहेत. व्यापाऱ्याकडून पेरूला 70 रुपये भाव मिळाला आहे.
9/10

पेरुचा बहार आता संपत आला असून, दोन ते तीन टनाचा माल झाडावरच आहे.
10/10

पेरूचे दर उतरल्याने 35 ते 40 रुपये भाव मिळत आहे. तो माल स्थानिक बाजारपेठेत विक्री केला जात असून, त्यातूनही जवळपास एक लाखाचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा मगर यांना आहे.
Published at : 05 Dec 2023 03:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
