Sushma Andhare FULL PC :Neelam Gorheयांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार,सुषमा अंधारे कडाडल्या
Sushma Andhare FULL PC :Neelam Gorheयांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार,सुषमा अंधारे कडाडल्या
शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यावरून ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झालीये, २०१७ ते २०२२ पर्यंत नीलम गोऱ्हेंनी पक्षप्रवेश रोखून ठेवला, असा आरोप सुषमा अंधारेंनी नीलम गोऱ्हेंवर केलाय...नीलम गोऱ्हेंनी त्यांचे म्हणणे कोर्टात सादर करावे नाहीतर नाक घासून माफी मागावी, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केलीये..
ज्या नीलम गोऱ्हेंना पक्षानी चार वेळा आमदारकी दिली त्यांनी त्यांच्या मॉडेल कॉलनीतील भागात शिवसेनेती एक साधी शाखाही उघ़डली नाही त्यांनी माझा शिवसेनेत पक्षप्रवेश होऊ दिला नाही माझा पक्षप्रवेश होईपर्यंत नीलम गोऱ्हेंच्या कानावर पडू दिलं नाही पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा हे सगळं काम नीलम गोऱ्हे बघायच्या नीलम गोऱ्हेंनी आमदारकीसाठी मर्सिडीज दिल्या तर त्या कुठून आणल्या नीलम गोऱ्हेंचा व्यवसाय काय, की त्यांचा अडीचशे कोटींची संपत्ती आहे नीलम गोर्हेंची साहित्यसंपदा काय...गोऱ्हे यांनी त्यांच्या कामाची सुरुवात करताना एस एफ आय मधून केली नंतर भारिप मध्ये उडी मारली प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे त्यांना ओळख मिळाली ईमानदारी, प्रामाणिकपणा त्यांच्या शब्दकोशात नाही प्रकाश आंबेडकर यांच्याशी त्यांनी बेइमानी केली पवार साहेबांकडे आणि त्यांच्या पक्षाशी बेइमानी केली मग त्या आमच्याकडे आल्या त्या जिथे राहतात त्यांनी एक ढाका उभी केली नाही, लोकांना कसे बाजूला ठेवता येईल हे त्यांनी केलं २०१७ ते २०२२ पर्यंत त्यांनी माझा पक्षात प्रवेश होऊ दिला नाही २ मर्सिडीज दिल्या असं म्हणत असतील तर त्यांनी त्यांच्या २ मर्सिडीज कुठून आणल्या? त्यांचा कुठली मालमत्ता आहे जी २५० करोड ची आहे त्याची मालमत्ता आता तपासावी लागेल साहित्य संमेलन मध्ये ज्याला बोलावलं जातं त्याचा किमान चारोळी लिहली असावी मग त्यांना तिथे कशाला बोलावलं होतं साहित्य मंडळाने त्यांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण कशाचे दिले होते शिवसेनेवर बोलण्याचा प्रयत्न अतिशय केविळवाणा आहे गोऱ्हे यांच्यासारखा व्यक्तीला पैशाची गदार नाही त्यांनी अनेक पदं भूषवली म्हणजे अनेक मर्सिडीज चे किंमत त्यात होती आहे हा अब्रू नुकसानीचा दावा किती असेल, त्याची रक्कम किती असेल हे संध्याकाळपर्यंत कळवले जाईल एकनाथ शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांनाच माहिती असेल की कलेक्शन किती होतं निलम गोऱ्हे यांनी त्यांचे म्हणणे कोर्टात सादर करावे नाहीतर नाक घासून माफी मागावी निलम गोऱ्हे यांनी कर्तृत्व नसताना अनेक पदं भूषवली मला वेळ आणू नका, भारिप मध्ये असताना तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्यांनी काय काय केलं मला या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील
महत्त्वाच्या बातम्या























