Russia Ukraine War : रशियाला आणखी एक झटका, दोन जहाज नष्ट केल्याचा युक्रेनचा दावा
Russia Ukraine Crisis : काळ्या समुद्रात युक्रेनने रशियाला मोठा झटका दिला आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार, युक्रेनने रशियाचे दोन गस्ती जहाज नष्ट केल्याचा दावा केला आहे.
Russia Ukraine Conflict : युक्रेन आणि रशियामधील युद्धाचा आज 69 वा दिवस आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष मिटण्याची चिन्हं दिसत नाहीत. एकीकडे रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरु असताना युक्रेनही रशियाला चोख प्रत्युत्तर देताना दिसत आहे. रशिया आणि युक्रेनच्या युद्धात काळा समुद्र खूप महत्त्वाचा असल्याचं मानलं जातं. काळ्या समुद्रात युक्रेन रशियाला खडतर लढाई लढावी लागत आहे. एका रिपोर्टनुसार युक्रेनने रशियाला मोठा झटका दिला आहे. युक्रेनने हवाई हल्ल्यांत रशियाचे दोन गस्ती जहाज नष्ट केल्याचा दावा केला आहे.
क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा युक्रेनचा दावा
युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडियावर या संदर्भात एक व्हिडीओ जारी करत लिहिलं आहे की, युक्रेनच्या सैनिकांनी आत्मसमर्पण न केल्यानं रशियाला मोठा धक्का बसला आहे. युक्रेनच्या सैन्याने काळ्या समुद्रातील स्नेक आयलंडजवळ दोन रशियन गस्ती जहाजं क्षेपणास्त्र हल्ल्यानं नष्ट केली आहेत. स्फोटामुळे रशियाची दोन्ही जहाजं बुडाली. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर दोन बोटी बुडताना दिसत आहेत.
रशियाने युक्रेनचा दावा पुन्हा फेटाळला
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या लष्कराने दोन जहाजांवर दोन R-360 नेपच्यून अँटी-शिप क्षेपणास्त्रांचा मारा केला. मात्र रशियाने म्हटलं आहे की, दोन्ही जहाजांना अचानक आग लागली, त्यामुळे ती पाण्यात बुडाली. दरम्यान, रशियन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी सोमवारी सांगितलं की, रशियाने गेल्या 24 तासांत युक्रेनच्या 38 लक्ष्यांना लक्ष्य करण्यासाठी अनेक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या झापोरिझ्झ्या प्रदेशातील चेरव्हॉनजवळील दारूगोळा डेपो देखील नष्ट झाला आहे.
Case against e-commerce portal for selling abortion pills Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/91270684.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst
गेल्या महिन्यात रशियालाही दणका
काळ्या समुद्रात गेल्या दीड महिन्यात रशियाला युक्रेनने दिलेला हा दुसरा धक्का आहे. याआधी एप्रिलमध्ये काळ्या समुद्रात उभ्या असलेल्या रशियन युद्धनौका मॉस्कव्हॅनवरही हल्ला करत ती नष्ट करण्यात आली होती. याबाबत युक्रेनने क्षेपणास्त्र हल्ला करुन युद्धनौका उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता, तर रशियाने हा दावा फेटाळून लावत युद्धनौकेच्या आत मोठ्या प्रमाणात स्फोटके ठेवण्यात आली होती. त्यातही अचानक झालेल्या स्फोटाने जहाजाला धडक दिली आणि ते बुडाले, असे सांगितले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Russia Ukraine War : 9 मेनंतर रशिया युद्ध संपण्याची घोषणा करणार? नक्की काय रशियाची भूमिका? जाणून घ्या...
- Viral Video : उंच आकाशात अनोखा स्टंट, तब्बल सहा हजार फुट दोरीवर चालत पठ्ठ्यानं केली कमाल
- Char Dham Yatra 2022 : आजपासून चारधाम यात्रा सुरू, गंगोत्री-यमुनोत्रीचे दरवाजे उघडणार, कोविड अहवालाची गरज नाही
- Eid 2022 : रमजान ईदचा उत्साह, नमाज अदा करण्यासाठी मशिदीमध्ये गर्दी