Viral Video : उंच आकाशात अनोखा स्टंट, तब्बल सहा हजार फुट दोरीवर चालत पठ्ठ्यानं केली कमाल
Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक माणूस हवेत दोन हॉट एअर बलूनमध्ये दोरी बांधून कोणाच्याही मदतीशिवाय त्यावर चालताना दिसत आहे.
Trending Video : जगभरातील अनेक लोक प्रसिद्ध होण्यासाठी वेगवेगळे विक्रम करताना दिसतात. अनेक लोकांचे असे अनोखे विक्रम गिनीज बुकमध्ये नोंदही होतात. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अनोखे पराक्रम करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हवेत दोन हॉट एअर बलूनमध्ये दोरी बांधून कोणाच्याही मदतीशिवाय त्यावर चालताना दिसत आहे. हजारो फुट उंचीवर प्रचंड वाऱ्यांचा वेग असताना हा व्यक्ती अनोखा विक्रम करताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, राफेल झुग्नो ब्रीडी (Rafael Zugno Bridi) नावाच्या व्यक्तीने हवेत दोन हॉट एअर बलूनमध्ये एक दोरी बांधून 1,901 मीटर (6,236 फूट) उंचीवर अनवाणी पायाने चालत विश्व विक्रम केला आहे.
View this post on Instagram
राफेल झुग्नो ब्रिडी हा ब्राझीलचा रहिवासी आहे. राफेलने हवेत दोन हॉट एअर बलूनमध्ये दोरी बांधून त्यावर स्लॅकलाइन वॉक करून सर्वांना थक्क केलं आहे. राफेल जुग्नो ब्रिदी यांच्या नावावर सर्वाधिक स्लॅकलाइन वॉक केल्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली आहे.
हा व्हिडीओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अपलोड करण्यात आला आहे, जो पाहून युजर्स चांगलेच थक्क झाले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत 8 लाख 50 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 78 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओला यूजर्सची चांगली पसंती मिळत आहे. नेटकरी राफेल झुग्नो ब्रिदीचे कौतुक करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
