Char Dham Yatra 2022 : आजपासून चारधाम यात्रा सुरू, गंगोत्री-यमुनोत्रीचे दरवाजे उघडणार, कोविड अहवाल अनिवार्य नाही
Char Dham Yatra 2022 : चार धाम यात्रा (Char Dham Yatra) आजपासून सुरू होत आहे. गंगोत्री (Gangotri) आणि यमुनोत्री (Yamunotri) मंदिरांचे दरवाजे आज उघडणार आहेत.
![Char Dham Yatra 2022 : आजपासून चारधाम यात्रा सुरू, गंगोत्री-यमुनोत्रीचे दरवाजे उघडणार, कोविड अहवाल अनिवार्य नाही char dham yatra 2022 start today on akshaya tritiya doors of gangotri yamunotri will open and know about covid guideline Char Dham Yatra 2022 : आजपासून चारधाम यात्रा सुरू, गंगोत्री-यमुनोत्रीचे दरवाजे उघडणार, कोविड अहवाल अनिवार्य नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/96001170b1757c392e59860f5661c505_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Char Dham Yatra 2022 : आज अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर चार धाम यात्रेला (Char Dham Yatra) सुरूवार होणार आहे. गंगोत्री (Gangotri) आणि यमुनोत्री (Yamunotri) मंदिरांचे दरवाजे आज उघडणार आहेत. चार धाम यात्रेसाठी कोरोनाचा निगेटिव्ह अहवालाची आवश्यकता नसणार आहे. उत्तरकाशीमधील गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचे दरवाजे आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खुले करण्यात येणार आहेत. यासह यावर्षीच्या चार धाम यात्रेला सुरुवात होईल.
केदारनाथ मंदिर 6 मे रोजी खुले करण्यात येणार आहे. बद्रीनाथ मंदिर 8 मे रोजी खुले करण्यात येईल. आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गंगोत्री मंदिराचे दरवाजे सकाळी 11.15 मिनिटांनी उघडण्यात येणार आहेत. तर यमुनोत्री मंदिराचे दरवाजे दुपारी 12.15 मिनिटांनी खुले करण्यात येतीय. यासह चार धाम यात्रेला सुरुवात होईल.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या निश्चित
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे चार धाम यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी निर्बमध हटल्यामुळे मोठ्या संख्येने यात्रेकरु येण्याची अपेक्षा आहे. हे पाहता उत्तराखंड सरकारने चार धामांमध्ये दररोज दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या निश्चित केली आहे. अक्षय्य तृतीयेच्या आजपासून सुरू होणाऱ्या यात्रेदरम्यान दररोज जास्तीत जास्त 15 हजार यात्रेकरू बद्रीनाथ, 12 हजार केदारनाथ, सात हजार यात्रेकरु गंगोत्री आणि चार हजार यात्रेकरु यमुनोत्री मंदिरात दर्शन घेऊ शकतील. सध्या पहिल्या 45 दिवसांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
कोविड निर्बंधामध्ये दिलासा
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चारधाम यात्रा मार्गांवर रात्री 10 ते पहाटे 4 वाजेपर्यंत वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या वर्षी चार धाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये येणाऱ्या यात्रेकरूंना कोविड चाचणी अहवाल किंवा लसीकरण प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक नाही. यात्रेला जाण्यापूर्वी भाविकांना पर्यटन विभागाच्या पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक असेल.
कोविड चाचणीचा अहवाल किंवा बाहेरील राज्यातून येणाऱ्या यात्रेकरूंच्या लसीकरण प्रमाणपत्र पुढील आदेशापर्यंत बंधनकारक नसेल. भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये आणि राज्याच्या सीमेवर गर्दी होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, अधिकाऱ्यांना परिस्थितीवर प्रशासनाची बारीक नजर आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)