South Africa : दक्षिण आफ्रिकेच्या नाइट क्लबमध्ये 17 जणांचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु
South Africa : या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचं प्रांतीय पोलिस प्रवक्ते ब्रिगेडियर थेंबिन्कोसी किनाना यांनी सांगितलं आहे. स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहावर जखमांच्या कोणत्याही स्पष्ट खुणा नाहीत.

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) दक्षिणेकडील शहर इस्ट लंडनमधील (East London) एका नाइट क्लबमध्ये (Night Club) रविवारी सुमारे 17 जणांचे संशयास्पदरित्या मृतदेह आढळले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह आढळले सर्वजण युवा आहेत. प्रांतीय पोलिस प्रवक्ते ब्रिगेडियर थेंबिन्कोसी किनाना यांनी सांगितलं आहे की, आम्हांला 17 जणांच्या मृत्यूबाबत एक तक्रार मिळाली आहे. इस्ट लंडनमधील सीनरी पार्क येथील एका नाइट क्लबमध्ये हे मृतदेह संशयास्पदरित्या आढळले आहेत. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. मृत्यू झालेल्या सर्वाचं वय सुमारे 18 ते 20 वर्षादरम्यान आहे.
या 17 जणांच्या मृत्यूमागे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. घटनास्थळी दाखल झालेले सुरक्षा विभागाचे अधिकारी उनती बिनकोस यांनी चेंगराचेंगरीमुळे या लोकांचा मृत्यू झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. बिनकोस यांनी सांगितलं आहे की, चेंगराचेंगरीमुळे या लोकांचा मृत्यू झाला असं सांगता येणार नाही, कारण मृतांच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या कोणत्याही खुणा नाहीत.
मृतांच्या शरीरावर जखमांच्या खुणा नाहीत.
स्थानिक वृत्तपत्रा 'डिस्पॅचलाइव'च्या (DispatchLive) रिपोर्टनुसार, 'नाईट क्लबमध्ये टेबल, खुर्च्या आणि जमिनीवर मृतदेह पडलेले होते. या मृतदेहांवर जखमांच्या कोणत्याही खुणा आढळलेल्य नाहीत.' सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या घटनास्थळाच्या फोटोंमध्येही मृतांच्या शरीरीवर जखमा दिसत नाहीत.
स्थानिक टेलिव्हिजनच्या माहितीनुसार, मृतांचे आईवडील आणि नातेवाईकांकडून प्रशासनाचा निषेध करण्यात येत असून पोलीस जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. नाईट क्लबबाहेर लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. या नाइट क्लबमध्ये हायस्कूलच्या परीक्षिनंतर पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
