World Record : जगातील सर्वात मोठा 'स्टिंगरे', या ठिकाणी सापडला 300 किलोचा वाघळी मासा
Biggest Fish of Fresh Water : मच्छीमारांना आतापर्यंतचा सर्वात मोठा स्टिंगरे (Stingray Fish) म्हणजे वाघळी मासा सापडला आहे. हा गोड्या पाण्यातील मासा सुमारे 300 किलो वजनी आणि 13 फूट लांब आहे.
Biggest Fish of Fresh Water : समुद्राच्या खोलात अनेक जीव अद्यापही अनेक जीव असे आहेत, ज्यांच्या बद्दल मानवाला माहित नाही. समुद्रामध्ये अनेक छोटे-मोठे जीव आढळून येतात. देवमासा (Whale) हा समुद्रातील सर्वात मोठ्या प्रजातीचा मासा ओळखला जातो. मात्र तुम्हाला गोड्या पाण्यातील सर्वात मोठा मासा माहित आहे का? स्टिंगरे (Stingray) म्हणजेच वाघळी मासा गोड्या पाण्यातील सर्वात मोठा मासा म्हणून ओळखला जातो. जैवशास्त्रज्ञ मागील अनेक वर्षांपासून सर्वात मोठ्या स्टिंगरेच्या शोधात आहेत. त्याचा हा शोध कंबोडियामध्ये संपला आहे.
या देशात सापडला महाकाय वाघळी मासा
कंबोडिया देशातील मेकांग नदीमध्ये आतापर्यंतचा जगातील सर्वात मोठा स्टिंगरे म्हणजे वाघळी मासा सापडला आहे. हा गोड्या पाण्यात सापडलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा मासा आहे. कंबोडियातील मेकांग ही गोड्या पाण्याची नदी आहे. हा मासा मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये सापडला. एवढा मोठा मासा जाळ्यात सापडल्यावर आधी मच्छीमार घाबरले होते.
त्यानंतर मच्छीमारांनी त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेत माशाला जाळ्यातून बाहे काढलं. या माशाचं वजन 300 किलो तर लांबी 13 फूट आढळली. या माशाबाबत माहिती मिळताच मच्छिमारांनी दक्षिण आशियामधील नद्यांच्या विविधतेच्या संरक्षणासाठी काम करणारे डॉ. होगन यांच्याशी संपर्क साधला. या नदीमध्ये एवढा मोठा स्टिंगरे सापडणं हे तर आश्चर्यकारकच होतं. मासेमारांनीही आजपर्यंत एवढा मोठा वाघळी मासा पाहिलेला नव्हता.
New record: Largest freshwater fish - 330 kilograms
— Guinness World Records (@GWR) June 24, 2022
This stingray weighs the same amount as a grizzly bear! 🤯 pic.twitter.com/FA3sBa0Ccy
डॉ. होगन यांनी या माशासंदर्भात माहिती देत सांगितलं की, या प्रजातीचा मासा अत्यंत विषारी आणि धोकादायक मानला जातो. या माशाची शेपटी अत्यंत विषारी असते. पण हा मासा माणसांसाठी विषारी नसतो. डॉ. होगन हे दक्षिण आशियामध्ये नदीतील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या 'वंडर्स ऑफ द मेकांग' प्रकल्पाचे सदस्य आहेत.
डॉ. होगन गेल्या 17 वर्षांपासून गोड्या पाण्यातील सर्वात मोठ्या स्टिंगरे माशाचया शोधात आहेत. त्यांचा हा शोध कंबोडियामध्ये संपला. या मादा स्टिंगरेला इलेक्ट्रिक टॅग लावून पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. इलेक्ट्रिक टॅगद्वारे शास्त्रज्ञांना माशाबाबत अधिक माहिती मिळण्यास मदत होते.
हा महाकाय स्टिंगरे सापडण्याआधीही एक महिन्यापूर्वी एक मोठा वाघळी मासा सापडला होता. त्याचं वजन 181 किलो होते. शिवाय या वर्षातही आतापर्यंत दोन मोठे स्टिंगरे आढळले होतं. याआधी 2005 मध्ये थायलंडमध्ये असाच विशालकाय मासा सापडला होता. मात्र कंबोडियामध्ये सापडलेल्या माशाचं वजन त्या माशापेक्षा 6.8 किलोनं जास्त आहे.