Viral News : शरीर आहे की, रबर? व्हिडीओमधील तरुणाची लवचिकता पाहून नेटकरी अवाक्!
Viral Video : काश्मीरमध्ये 'रबर बॉय' (Rubber Boy) म्हणून ओळखल्या जाणार्या एका व्यक्तीचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो शरीरात हाडे नसल्याप्रमाणे हातपाय वाकवतो आहे.
Trending Video : सोशल मीडियावर (Social Medie) कोणतीही गोष्ट काही मिनिटांमध्ये व्हायरल होताना पाहायला मिळतात. इंटरनेटमुळे जगभरात कोणताही व्हिडीओ काही सेकंदात व्हायरल होतो. या इंटरनेटमुळे अनेक कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. यामुळे तळागाळात लपलेले कलाकार त्यांची कला जगभरात पोहोचवू शकतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे लोक चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पठ्ठ्या शरीराची अजब कवायती करताना दिसत आहे. हा तरुण शरीराचे भाग वेगवेगळ्या प्रकारे वाकवताना दिसत आहे, हे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
व्हिडीओमधील तरुणाचं नाव सिम हैदर असून त्याची काश्मीरचा 'रबर बॉय' (Rubber Boy of Kashmir) अशी ओळख आहे. सिम आपलं शरीर रबराप्रमाणे वाकवू शकतो. सिमला त्याचं हे टॅलेंट 'इंडियाज गॉट टॅलेंट' (India's Got Talent) कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नेण्याचं स्वप्न आहे. काश्मीरचा हा रबर बॉय 2010 पासून यासाठी सराव करत आहे.
व्हायरल व्हिडीओ पाहा
सिमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून तो चर्चेचा विषय बनला आहे. त्याच्या कवायती पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. सिम त्याच्या शरीराचे अवयव त्याला हवे तसे फिरवतो. तुम्ही हे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे पाहू शकता.
नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा रबर बॉयच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कवायती पाहून नेटकऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. नेटकरी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट करत आहेत.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
