Pune Crime News : अनैतिक संबंधातून व्यक्तीला गाडीखाली चिरडलं अन् अपघात असल्याचं भासवलं; जुन्नर जवळील घटना
पुण्यातील जुन्नर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्नर तालुक्यात अनैतिक संबंधातन एका व्यक्तीला गाडीखाली चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे.
जुन्नर, पुणे : पुण्यातील जुन्नर तालुक्यातून धक्कादायक (Cyber Crime) घटना समोर आली आहे. जुन्नर तालुक्यात अनैतिक संबंधातुन एका व्यक्तीला गाडीखाली चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र यामध्ये अपघात दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुणे नाशिक महामार्गालगत एका हॉटेल समोर ही घटना घडली आहे. शाबिर कुरेशी असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पुणे नाशिक महामार्गालगत एका हॉटेल समोर शाबिर कुरेशी हा व्यक्ती दुचाकीवर बसलेला असताना पाठीमागे भारधाव वेगाने आलेल्या कारने दुचाकीस्वाराला जागीच चिरडले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यु झाला. हा सर्व थरार सीसीटीव्ही कँमेरात कैद झाला आरोपी अभिजित सोनवणे याला नारायणगाव पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. हा सर्व प्रकार अनैतिक संबंधातुन बदला घेण्यासाठी केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सीसीटीव्हीत नक्की काय आहे?
सोनावणे हा आपली कार थेट मागे घेऊन जाताना दिसत आहे. रिव्हर्स कार घेऊन या कुरेशीला चिरडलं आहे. साधारण दुपारच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती आहे. गाडी रिव्हर्स घेऊन कुरेशीच्या थेट अंगावर घातली आणि यात कुरेशीचा मृत्यू झाला. सीसीटीव्हीत हे सगळं चित्र दिसत आहे. मात्र हा अपघात असल्याचं सोनावणे याने सांगितलं आहे. अनैतिक संबंधातून हे केल्याचा आरोपदेखील आहे.
पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं..
पुण्यात मागील काही दिवसांपासून हत्येचं प्रमाण चांगलंच वाढत आहे. क्षृल्लक कारणावरुन हत्या करण्यात येत आहेत. भरदिवसा गोळ्या घालून तर कोयत्याने हल्ला करुन हत्या करण्यात आल्याचे प्रकारही अनेक आहेत. यात काही अनैतिक संबंधातून, काही रागातून तर काही टोळीयुद्धातून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यात आता शाळकरी मुलांचादेखील समावेश असल्याचं मागील दोन घटनांमधून समोर आलं आहे. शाळकरी मुलांवरही गुन्हेगारीचा परिणाम होताना दिसत आहे. ही गुन्हेगारी रोखणं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
Pune Weather Update : उकाड्यापासून पुणेकरांना काहीसा दिलासा; पुढील दोन दिवस पावसाची शक्यता