एक्स्प्लोर

Nashik News : नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाकडून खासगी बस चालकांना तंबी, सूचना पाळा, कारवाई टाळा

Nashik News : नाशिकच्या (Nashik) प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खाजगी बसेसची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Nashik Bus Safety : खाजगी बसेसच्या (Bus) वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अपघातांचे (Bus Accident) प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने बसेसची विशेष तपासणी मोहिम सुरू करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील स्लीपर बस चालक व मालक यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक येथे आपल्या बसेस पुर्न:तपासणी करून प्रमाणित करून घ्याव्यात, असे  प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी कळविले आहे.

नाशिकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (Regional Transport Office) स्लीपर बसचे अपघात रोखणे (Travels Accident) व आपत्कालीन प्रसंगी जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजना व सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बसचा आपत्कालीन दरवाजा सुस्थितीत असणे आवश्यक आहे. त्यासमोर व मागे कोणत्याही प्रकारचा अडथळा असू नये. आपत्कालीन दरवाजाच्या दर्शनी भागात हॅमर उपलब्ध होणे आवश्यक आहे. आपत्कालीन प्रसंगी बाहेर पडण्याचे मार्ग तसेच बसमधील अन्य बचावात्मक उपकरणांसबंधीची माहिती प्रवाशांना प्रवास सुरू होण्यापूर्वी देणे आवश्यक आहे. याबाबतची चित्रफित बसमध्ये प्रसारित करण्यात यावी, अथवा ईमेल व व्हाट्ॲपद्वारे बसमधील प्रवाशांना चित्रफित प्रसारित करण्यात यावी.

तसेच वाहन चालक हा मद्यप्राशन अथवा अंमलीपदार्थांचे सेवन करून वाहन चालविणार नाही, याची खातरजमा करूनच वाहनमालकांनी वाहनचालकास वाहन चालविण्यास देणे आवश्यक आहे. या संदर्भातील सर्वस्वी जबाबदारी वाहन मालकाची असेल, यांची नोंद घ्यावी. तसेच परिवहन विभागाच्या तपासणी दरम्यान वाहनचालक मद्यप्राशन केलेला आढळल्यास मोटर वाहन कायदा कलम 185/S,188 प्रमाणे कारवाईस तो पात्र राहील. वाहन चालक वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करणार नाहीत, याचीही वाहन मालकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. परिवहन विभागाच्या तपासणीत वाहनचालक मोबाईलवर बोलतांना आढळल्यास मोटार वाहन कायद्यातील कलम 250 A,177 नुसार होणाऱ्या कारवाईस तो पात्र राहील व वाहनाचा परवाना व वाहनचालकाची अनुज्ञप्ती (License) निलंबित करण्यात येईल.

सूचनांचे पालन करा, अन्यथा....

वेळोवेळी वाहनचालकांनी नेत्र व आरोग्य तपासणी करून घ्यावी. दर 2 तासांनी विश्रांती घेण्याबाबत  वाहन चालकांना सूचना देण्यात याव्यात. वाहन चालवितांना वेग मर्यादेचे उल्लंघन होणार नाही यादृष्टीने वाहनांना  योग्य ते गती नियंत्रक बसविणे, वाहनात बसविण्यात आलेले स्पीड गर्व्हनर उपकरण सुस्थितीत  व कार्यान्वीत ठेवणे व वेळोवेळी त्याचे कॅलिब्रेशन करून घेणे, याची जबाबदारी वाहन मालकांची आहे. बसमधील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असावी. बसमध्ये क्षमतेपेक्षा अतिरिक्त प्रवाश्यांची वाहतुक करू नये. वाहन चालवितांना वाहनचालकांनी लेनची शिस्त पाळणे व दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे याबाबत वाहनचालकांना निर्देश देण्यात यावेत. वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र विहित मुदतीतमध्ये नुतनीकरण करून घ्यावे तसेच वाहन निरंतरपणे सुस्थितील राहील, याची वाहनचालकांनी व वाहन मालकांनी दक्षात घ्यावी. वरील नियमांचे पालन करून अपघातमुक्त प्रवासी वाहतुक करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन प्रदीप शिंदे यांनी केले आहे.

इतर संबंधित बातम्या :

Nashik News : लायसन्स काढायचंय, थांबा! नाशिक आरटीओ थेट तुमच्या गावात येतंय!

Nashik Bus Accident : देवीचं बोलावणं आलं, मुडी गावातून चौदा महिला गडावर दर्शनासाठी आल्या, मात्र जाताना तेराच गेल्या.... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 11 March 2025 : 6 PMABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6 PM 11 March 2025Top 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 11 March 2025 :  ABP Majha : 5 PmPrakash Solanke Statement | मी फक्त 10 ते 12 कोटी खर्चून निवडणूक जिंकलो; सोळंकेंचं वक्तव्य, अडचणी वाढणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 
उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 
गृहनिर्माण सोसायट्यांच्या गाळ्यात दारुदुकान सुरु करण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक, अजित पवारांची मोठी घोषणा
गृहनिर्माण सोसायट्यांच्या गाळ्यात दारुदुकान सुरु करण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक, अजित पवारांची मोठी घोषणा
छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?
छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?
Pakistan Train Hijack मोठी बातमी ! पाकिस्तानमध्ये 'जाफर एक्सप्रेस हायजॅक'; 6 जवानांना मारलं, ट्रेनमधील 120 प्रवासी ओलीस
मोठी बातमी ! पाकिस्तानमध्ये 'जाफर एक्सप्रेस हायजॅक'; 6 जवानांना मारलं, ट्रेनमधील 120 प्रवासी ओलीस
Embed widget