एक्स्प्लोर

छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?

कोल्हापूर पोलिसांच्या जुना राजवाडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होताच फरार झालेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळाला होता.

Prashant Koratkar Threat Case : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविरोधात गरळ ओकून फरार झालेल्या प्रशांत कोरटकरला तगडा बसला आहे. उद्या (12 मार्च) कोर्टात प्रशांत कोरटकरला जमीन अर्ज सुनावणीसाठी उपस्थित रहावे की नाही यासंदर्भात निर्णय होणार आहे. आज अंतरिम जामीनाची मुदत संपल्याने प्रशांत कोरटकर कोल्हापूर पोलिसांकडे हजर होणार का? याकडे लक्ष आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयात कोरटकरचा अंतरिम जामीनची मुदत आजपर्यंत (11 मार्च) असल्याने सुनावणी झाली. कोल्हापूर पोलिसांच्या जुना राजवाडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होताच फरार झालेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळाला होता. मात्र, त्याला कोल्हापूर पोलिसांसमोर हजर होण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, प्रशांत कोरटकर अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. राज्य सरकारकडून कोरटकरचा अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. कोल्हापूर सत्र न्यायालयात आमची बाजू ऐकण्यात आली नाही, असेही सरकारने म्हटले होते. या संदर्भात उच्च न्यायालयाने आज (11 मार्च) प्रकरण कोल्हापूरमध्ये प्रलंबित असल्याने कोणताही आदेश न देता कोल्हापूर सत्र न्यायालयाला सरकारची बाजू समजून घेत योग्य निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. 

विविध कलमांखाली गुन्हा दाखल

कोल्हापूर सत्र न्यायालयात न्यायाधीश कश्यप यांच्यासमोर सुनावणी पार पाडली. सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी सुद्धा हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. छत्रपती शिवराय हे आमचे दैवत असल्याने आमचे देखील म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी हस्तक्षेप याचिकेतून करण्यात आली होती. प्रशांत कोरटकरवर जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता 196, 197, 299, 302, 151, 352 कलमानुसार गुन्हे दाखल आहेत. महापुरुषांचा अवमान, दोन समाज तेढ निर्माण करणे, धमकी देणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागुपरातही याच कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. अन्य जिल्ह्यांमध्येही प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल झाला आहे. 

आमच्या देवाच्या अपमान आम्ही कसा सहन करायचा?

हस्तक्षेप याचिकेवर बोलताना वकील बाबा इंदुलकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना आम्ही पूजतो, देव मानतो. या आमच्या देवांचा अपमान आम्ही कसा सहन करायचा? आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. म्हणून या प्रकरणात आमचं म्हणणं कोर्ट ऐकणार नसेल, तर कोणाचं ऐकणार आहे? दरम्यान, हस्तक्षेप याचिकांना प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी जोरदार विरोध केला. 

असीम सरोदेंचा ऑनलाईन युक्तिवाद 

या प्रकरणात इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी ऑनलाइन युक्तिवाद करत प्रशांत कोरटकरने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. मोबाईल इरेज करून सिम कार्ड आणि मोबाईल जमा केल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्यांदा कोरटकरने माझा आवाज नसल्याचे सांगितले आणि दुसरीकडे, मोबाईलमधील डेटा डिलीट केला असल्याचे न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले.  यावेळी कोरटकरच्या वकिलांनी जे काही मोबाईलमध्ये होते ते अजूनही असल्याचा दावा केला. 

गुन्हा दाखल होताच कोरटकर फरार 

प्रशांत कोरटकर फरार झाल्यानंतर कोल्हापूर पोलिस त्याच्या मागावर आहेत. मात्र, अजूनही तो पोलिसांना सापडलेला नाही. प्रशांत कोरटकर मुंबईत असल्याची चर्चा असतानाही त्याच्यावर अजून अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही. त्याने आपला मोबाईल पत्नीच्या माध्यमातून पोलिसांकडे जमा केला होता. मात्र, तो मोबाईल फाॅरमॅट करून डेटा डिलीट करण्यात आला होता. त्यामुळे कोरटकरकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे वकील असीम सरोदे यांनी म्हटले आहे. असीम सरोदे यांनी इंद्रजित सावंत यांच्याकडून बाजू मांडताना कोरटकर क्रिमीनल असल्याचे सांगितले. कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन देताना गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे म्हटले होते. 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget