समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातीलच अपघातांचे प्रमाण जास्त का ?
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्ग तयार झाल्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील 88 किलोमीटरच्या पट्ट्यात अपघातांचे प्रमाण हे इतर ठिकाणापेक्षा थोडे जास्तच आहे
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्ग तयार झाल्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील 88 किलोमीटरच्या पट्ट्यात अपघातांचे प्रमाण हे इतर ठिकाणापेक्षा थोडे जास्तच आहे, हे आतापर्यंतच्या झालेल्या अपघातांच्या संख्येवरून समोर आले आहे. त्यामुळे नेमकं बुलढाणा जिल्ह्यातील या पट्ट्यातच समृद्धी महामार्गावर अपघात का होतात ? याची कारण मीमांसा आज आपण करणार आहोत.
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटरचा सरळसोट महामार्ग आहे. या महामार्गावर कुठे गतिरोधक नाहीत किंवा टोल नाके नाहीत. त्यामुळे वाहनांचा वेग हा नेहमीपेक्षा जास्तच असतो. परंतु सध्या समृद्धी महामार्ग हा नागपूर ते भरवीर पर्यंत सुरू झालेला आहे. नागपूर ते भरविर हे अंतर 600 किलोमीटरचं आहे. या सहाशे किलोमीटरचा केंद्र किंवा मध्य भाग हा बुलढाणा जिल्ह्याचा 88 किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा पट्टा आहे. ज्यावेळी एखादे वाहन चालक आपला वाहन घेऊन नागपूरहून निघतो, त्यावेळी तो सलग तिनशे किलोमीटर वाहन चालवत बुलढाणा जिल्ह्यातील या पट्ट्यात पोहोचतो किंवा भरवीरकडून नागपूरकडे जाणारा चालक हाही तिनशे किलोमीटर वाहन चालवत बुलढाणा जिल्ह्याच्या या पट्ट्यात पोहोचतो. सलग तीनशे किलोमीटर वाहन चालवल्याने वाहन चालकाचा मेंदू हा थकलेला असतो. या वाहन चालकाला शारीरिक थकवा सुद्धा आलेला असतो. ज्याला आपण मेंटल फटीग म्हणूत.... आणि समृद्धी महामार्गावर कुठेही थांबून आराम करण्याची व्यवस्था नसल्याने रेस्टॉरंट नसल्याने वाहन चालक हा आपलं वाहन चालवत असतो. या पट्ट्यात आल्यानंतर तो थकलेला असल्यामुळे त्याला झोप लागणे हे स्वभाविक आहे आणि त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील या पट्ट्यात समृद्धी महामार्ग वाहतुकीस खुला झाला. तेव्हापासून आतापर्यंत 34 मोठे अपघात झालेले आहेत, त्यापैकी आजचा अपघातात सर्वात मोठा आहे.
सरकारने आता समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी समृद्धी महामार्गावर ठिकठिकाणी प्रौढ प्लाझा किंवा रेष झोन तयार करण्याची आवश्यकता आता भासू लागली आहे. कारण सलग महामार्गावर 200 ते 300 किलोमीटर वाहन चालवल्याने वाहन चालकाला थकवा येतो किंवा हायवे हिप्नोसिसचा तो बळी पडतो आणि त्यामुळे हे अपघात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. 11 डिसेंबरला समृद्धी महामार्ग सुरू झाला तर गेल्या सहा महिन्यात या महामार्गावर जवळपास बाराशे दोन अपघात झालेले आहेत. समृद्धी महामार्गावर आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावर विशेषता बुलढाणा जिल्ह्यातील या पट्ट्यात वाहन चालकांना सक्तीने थांबवून विश्रांती घेण्याच्या व त्याप्रमाणे उपाय योजना आखण्याचा आता सरकारने विचार करण्याची आवश्यकता आहे.