एक्स्प्लोर

उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीका केली आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना किती निधी दिला? हे ते सांगू शकत नसल्याचे कदम म्हणाले.

Ramdas Kadam on Uddhav Thackeray :  शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना किती निधी दिला? हे ते सांगू शकत नाहीत. उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? असा टोला रामदास कदमांनी ठाकरेंना लगावला. उध्दव ठाकरेंना आता टीका करण्याचेच काम आहे. ते भविष्यात कधीच सत्तेत येणार नाहीत. केलेल्या कर्माची फळं उध्दव ठाकरेंना भोगावी लागतील असेही कदम म्हणाले. 

भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही

बजेटच्या मुद्यावरुन रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. बजेट हे पक्षाचे नसते,  उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? असे रामदास कदम म्हणाले. टीका करण्याचा उद्धव ठाकरेंचा धंदा सुरु राहुदेत असेही ते म्हणाले. भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नसल्याचे रामदास कदम म्हणाले. कर्नाटकमध्ये जाऊन मराठी किंवा हिंदी बोलून दाखवा असंही ते म्हणाले. तिथे बोलता येत नसेल तर मुंबईत इतर भाषा का? असा खडा सवाल रामदास कदम यांनी केला.  

लाडकी बहिण योजनेबाबत रामदास कदम यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य

लाडकी बहिण योजनेबाबत रामदास कदम यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. बजेट डोळ्यासमोर ठेऊन योजना राबवाव्या लागतात. लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसऱ्या योजना सुरु करता येतील असंही रामदास कदम म्हणाले. अंथरुण पाहून पाय पसरावे लागतात असेही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.  
संजय कदम पक्षात येणार असतील तर मी पायघड्या घालेन 

संजय कदम पक्षात येणार असतील तर मी पायघड्या घालेन 

माजी आमदार संजय कदम  (Former MLA Sanjay Kadam) यांच्या पक्षप्रवेशाच्या प्रश्नावर रामदास कदम यांची प्रतिक्रिया दिली आहे. संजय कदम यांच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय अद्याप झालेला नाही. ते पक्षात येणार असतील तर मी पायघड्या घालेन असेही रामदास कदम म्हणाले. कोकणात ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे. दापोली विधानसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि संजय कदम यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत संजय कदम यांची पक्षांतराची भूमिका ठरल्याची माहिती मिळत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का, रामदास कदमांना अंगावर घेणारा नेता शिंदे गटाच्या वाटेवर?

महत्त्वाच्या बातम्या

पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
रामदास कदमांसह नितीन बानगुडे पाटलांची निर्दोष मुक्तता, तब्बल 20 वर्षानंतर मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
रामदास कदमांसह नितीन बानगुडे पाटलांची निर्दोष मुक्तता, तब्बल 20 वर्षानंतर मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
दापोलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ, शिवसेना शहरप्रमुख पदाचा अखेर राजीनामा, नेमकं प्रकरण काय?
दापोलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ, शिवसेना शहरप्रमुख पदाचा अखेर राजीनामा, नेमकं प्रकरण काय?
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget