एक्स्प्लोर

Girish Mahajan : नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर, 3 गंभीर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

Nashik Accident: नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात मृत पावलेल्या पाच जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची शासकीय मदत देण्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

नाशिक : नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली. यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर 3 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर रात्री आठ वाजता हा अपघात (Nashik Accident) घडला. अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्वजण  सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील रहिवाशी होते. हे सर्वजण हे सर्वजण  निफाड तालुक्यातील धारणगाव येथे देवाचे कारण या कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून महिलांचा टेम्पो आणि पुरुषांचा टेम्पो पुन्हा नाशिकच्या दिशेने परतत होते. त्यावेळी हा अपघात घडला.

दरम्यान, या  भीषण अपघातातील जखमींची विचारपूस करण्यासाठी मंत्री गिरीष महाजन यांनी कल्पतरू खाजगी रुग्णालयात भेट दिली आहे. तर मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची शासकीय मदत देणार असल्याची घोषणा ही मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात आली आहे.  तर बऱ्याच अपघतामध्ये नियमांचे पालन होत नसतात. गाड्यांना टेललॅम्प, रेडियम इत्यादि अत्यावश्यक गोष्टीही नसतात. त्यामुळे या संदर्भात गंभीर दखल घेत कडक कारवाई केली जावी. अशी मागणीही मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी बोलवली पोलीस आणि आरटीओ विभागाची तातडीची बैठक

नाशिकच्या उड्डाण पुलावर रात्री झालेल्या अपघात प्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.  नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि आरटीओ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही तातडीची बैठक होणार आहे. अपघातात वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने ही बैठक घेत नियम अधिक कडक करत नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्याची शक्यता आहे.  वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी आणि कारवाई करण्यासंदर्भात गिरीश महाजन पोलीस आणि आरटीओ विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचेही बोलले जात आहे.

नाशिकच्या द्वारका पुलावर अपघात नेमका कसा घडला?

द्वारका उड्डाणपुलावर या मुलांना घेऊन जात असलेला टेम्पो एका ट्रकला जोरात धडकला. त्यामुळे ट्रकमधील लोखंडी सळ्या पिकअप ट्रकच्या काचा फोडून मागच्या भागात शिरल्या. या लोखंडी सळ्या थेट मागच्या भागात असलेल्या मुलांच्या अंगात शिरल्या. त्यामुळे त्यांच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव झाला. यामुळे पाच  मुलांचा  मृत्यू झाला. तर आणखी तिघांवर सध्या उपचार सुरू आहे.  

नाशिकमधील अपघाताचं खरं कारण समोर

लोखंडी सळ्यांनी भरलेला आयशर ट्रक रात्रीच्या अंधारात द्वारका उड्डाणपुलावरुन जात होता. या ट्रकच्या मागच्या बाजूला लाल दिवा किंवा कापड वा तत्सम कुठलेही निशाण लावलेले नव्हते. त्यामुळे टेम्पोचालकाला ट्रकमधील लोखंडी सळ्या बाहेर आल्याचे दिसले नाही. त्यामुळे टेम्पो वेगाने जाऊन ट्रकच्या मागच्या बाजुला आदळला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जोरदार धडक झाल्याने ट्रकमधील लोखंडी सळ्या टेम्पोच्या काचा फोडून आतमध्ये घुसल्या. या लोखंडी सळ्या मागच्या बाजूला असणाऱ्या मुलांच्या शरीरात शिरल्या आणि अनेकांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्वजण सिडको, अंबड भागातील कामगार असून एकमेकांचे नातेवाईक होते. या घटनेमुळे सिडको आणि अंबड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India vs Pakistan : 151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
घरकुलांना आता 50 हजार रुपयांचं अतिरीक्त अनुदान मिळणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती
घरकुलांना आता 50 हजार रुपयांचं अतिरीक्त अनुदान मिळणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती
Maratha Reservation : 'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा...' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 23 February 2025Anjali Damania On Beed Police News : बीड पोलिसांची अंजली दमानियांकडून पोलखोलJob Majha : भारतीय तटरक्षक दलमध्ये नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? 23 February 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 23 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Pakistan : 151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
घरकुलांना आता 50 हजार रुपयांचं अतिरीक्त अनुदान मिळणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती
घरकुलांना आता 50 हजार रुपयांचं अतिरीक्त अनुदान मिळणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती
Maratha Reservation : 'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा...' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
Rohit Sharma : 'साला यह दुःख काहे ख़त्म नहीं होता बे'! 15 नोव्हेंबर 2023 ते 23 फेब्रुवारी 2025! रोहित शर्माची पणवती सुटता सुटेना
'साला यह दुःख काहे ख़त्म नहीं होता बे'! 15 नोव्हेंबर 2023 ते 23 फेब्रुवारी 2025! रोहित शर्माची पणवती सुटता सुटेना
Telangana Tunnel Accident : तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
Embed widget