एक्स्प्लोर

Telangana Tunnel Accident : तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला

22 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बोगद्याच्या प्रवेश बिंदूपासून 14 किमी अंतरावर सुमारे 3 मीटर बोगद्याचा छत कोसळला आहे. यावेळी सुमारे 60 लोक बोगद्यात काम करत होते.

Telangana Tunnel Accident : तेलंगणातील नगरकुर्नूल जिल्ह्यातील श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल (SLBC) बोगद्याचा एक भाग 22 फेब्रुवारी रोजी कोसळला. यावेळी 8 कामगार अडकले असून एनडीआरडी-एसडीआरएफ बचावकार्य करत आहे. एसडीआरएफ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, बोगद्याच्या आत जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. गुडघ्यापर्यंत चिखल आहे. बोगद्याच्या आत ऑक्सिजन पाठवला जात आहे. पाणी काढण्यासाठी 100 अश्वशक्तीचा पंप लावण्याचे आदेश दिले आहेत. 145 NDRF आणि 120 SDRF जवान बचावकार्यासाठी तैनात आहेत. सिकंदराबादमधील इन्फंट्री डिव्हिजनचा भाग असलेल्या लष्कराच्या इंजिनीअर रेजिमेंटलाही सज्ज ठेवण्यात आले आहे.

प्रवेश बिंदूपासून 14 किमी अंतरावर सुमारे 3 मीटर बोगद्याचा छत कोसळला

22 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बोगद्याच्या प्रवेश बिंदूपासून 14 किमी अंतरावर सुमारे 3 मीटर बोगद्याचा छत कोसळला आहे. यावेळी सुमारे 60 लोक बोगद्यात काम करत होते. 52 लोक कसेबसे जीव मुठीत घेऊन बचावले, पण टनेल बोरिंग मशीन (TBM) चालवणारे 8 लोक अडकले. यामध्ये 2 अभियंते, 2 मशीन ऑपरेटर आणि चार मजुरांचा समावेश आहे. बचाव कार्य केले जात आहे.

श्री निवास उत्तर प्रदेशातील चंदौली येथील 

तेलंगणा बोगद्यात अडकलेला श्री निवास (48) चांदौली जिल्ह्यातील सदर कोतवाली भागातील माटीगाव येथील रहिवासी आहे. श्री निवास हे 2008 पासून हैदराबाद येथील जेपी कंपनीत कनिष्ठ अभियंता (JE) म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय उन्नाव येथे राहणारे मनोज कुमार हे देखील याच कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत. बेहता पोलीस ठाण्याच्या मटकुरी गावातील रहिवासी अर्जुन प्रसाद यांचा तो मुलगा आहे.

पंजाबमधील गुरप्रीत 20 दिवसांपूर्वी कामावर परतला

पंजाबमधील तरनतारन येथे राहणारा गुरप्रीत सिंग हा देखील बोगद्यात अडकला आहे. त्यांच्या घरी आई, पत्नी आणि 2 मुली आहेत. मोठी मुलगी 16 वर्षांची आणि धाकटी 13 वर्षांची आहे. वडिलांचे निधन झाले आहे. गुरप्रीतने दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. 20 दिवसांपूर्वीच घरून कामावर परतले होते. कुटुंबाकडे 2 एकरपेक्षा कमी जमीन आहे.

ऑगस्टमध्ये सुनकिशाला येथे रिटेनिंग वॉल कोसळली होती

याआधी ऑगस्ट 2024 मध्ये तेलंगणातील नागार्जुनसागर धरणाजवळील सुनकिशाला येथे रिटेनिंग भिंत कोसळली होती. भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) यासाठी काँग्रेस सरकारला जबाबदार धरत न्यायालयीन चौकशीची मागणी केली होती. बीआरएसच्या काळात हा प्रकल्प सुरू झाल्याचे सांगत काँग्रेसने पलटवार केला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
Amol Mitkari on Ajit Pawar CM: मोठी बातमी : पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
Maharashtra CM: पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
Embed widget