'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख प्रकरणाचा तपास सुरु आहे. बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 या दिवशी अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली.

Anjali Damania: संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना साहित्या पुरवणाऱ्या बालाजी तांदळेने जमिनीचा बंदोबस्त केला. तो प्रत्येक स्थळी उपस्थित असतो, तो आरोपींना शोधतो. त्याच्या नुसती चौकशी करून त्याला सोडून दिले? धनंजय मुंडे माझे दैवत ..वाल्मिक कराड माझे नेते..असे म्हणणारे बाळाजी तांदळे, यांना पत्र देऊन, त्यांना बरोबर घेऊन, त्यांच्याच जवळच्या मित्रांचा, जे खुनाचे आरोपी आहेत, ह्यांना घेऊन पोलिस शोध करू शकतात का ? असे सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहेत. X माध्यमावर यासंदर्भात त्यांनी पोस्टही केली आहे. (Anjali Damania)
गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख प्रकरणाचा तपास सुरु आहे. बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024या दिवशी अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. या प्रकरणाला उचलून धरणाऱ्या अंजली दमानिया गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडेंच्या राजिनाम्याची मागणी करत आहेत. आता या तपासाच्या अनुषंगाने त्यांनी पोलिसांच्या तपास पद्धतीवर अनेक सवाल केले आहेत.
काय केलीय दमानियांनी पोस्ट?
धनंजय मुंडे माझे दैवत
वाल्मिक कराड माझे नेते.
असे म्हणणारे बाळाजी तांदळे, यांना पत्र देऊन, त्यांना बरोबर घेऊन, त्यांच्याच जवळच्या मित्रांचा, जे खुनाचे आरोपी आहेत, ह्यांना घेऊन पोलिस शोध करू शकतात का ? जे पकडले गेले, ते
“मुद्दाम पकडवून, बळी दिले गेले”
ह्यात शंका आहे का ?
म्हणूनच कराड फरार राहू शकले आणि आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी दाखवले गेले की पोलिसांचा तपास चालू आहे. जर प्रकरण लावून धरलं नसतं तर कराडला देखील अटक झाली नसती.
बालाजी तांदळे, जो जमिनीचा बंदोबस्त करतो, प्रत्येक स्थळी उपस्थित असतो, तो शोधले आरोपींना ? ह्याची नुसती चौकशी करून त्याला सोडून दिले ? ह्याला जर थर्ड डिग्री वापरून चौकशी केली, तर कळेल सगळा कुणाच्या सांगण्यावरून होत होते.
पी आय गोसावी आणि भागवत शेलार यांचे सीडीआर जाहीर करा. पहिल्या दोन आरोपींची TIP कुणाकडून आली ?
देवेंद्र फडणवीस आता तरी काही बोलणार का अजून त्यांना गरज वाटत नाही?
धनंजय मुंडे माझे दैवत
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 23, 2025
वाल्मिक कराड माझे नेते.
असे म्हणणारे बाळाजी तांदळे, यांना पत्र देऊन, त्यांना बरोबर घेऊन, त्यांच्याच जवळच्या मित्रांचा, जे खुनाचे आरोपी आहेत, ह्यांना घेऊन पोलिस शोध करू शकतात का ? जे पकडले गेले, ते
“मुद्दाम पकडवून, बळी दिले गेले”
ह्यात शंका आहे का ?…
हेही वाचा:
हेही वाचा:

























