India vs Pakistan : 151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईमध्ये खेळला जात आहे. पाकिस्ताननं भारताला विजयासाठी 242 धावांचं आव्हान दिलं आहे.

Pakistan vs India, 5th Match : चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईमध्ये खेळला जात आहे. पाकिस्ताननं भारताला विजयासाठी 242 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात पाकिस्ताननं 49.4 षटकांत 241 धावांची मजल मारली. मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी रचलेल्या शतकी भागिदारीनंतरही, भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या डावाला ब्रेक लावला. या सामन्यात मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी तिसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी रचली. अक्षर पटेलनं रिझवानचा त्रिफळा उडवून ही जोडी फोडली. रिझवानचं अर्धशतक चार धावांनी हुकलं. मग हार्दिक पांड्याने सौद शकीलला 62 धावांवर माघारी धाडलं. त्यामुळं 2 बाद 151 धावांवरून पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान ऑलआऊट झाली.
Innings Break!
— BCCI (@BCCI) February 23, 2025
A fine bowling display from #TeamIndia and Pakistan are all out for 2⃣4⃣1⃣
3⃣ wickets for Kuldeep Yadav
2⃣ wickets for Hardik Pandya
A wicket each for Axar Patel & Ravindra Jadeja
Over to our batters 🙌
Scorecard ▶️ https://t.co/llR6bWyvZN#PAKvIND |… pic.twitter.com/Xo9DGpaIrX
दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय चुकीचा ठरला. बाबर आझमने चांगली सुरुवात केली पण 23 धावा करून तो बाद झाला. इमाम उल हकही फक्त 10 धावा करून बाद झाला. 47 धावांत 2 विकेट गमावल्यानंतर, मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी मिळून पाकिस्तानसाठी 104 धावा जोडल्या. शकीलने 62 धावांची महत्त्वाची खेळी खेळली.
India bowlers come good to restrict Pakistan to under 250 in Dubai 👊#ChampionsTropy #PAKvIND ✍️: https://t.co/O9lMfFTSG6 pic.twitter.com/uDttSOUPXg
— ICC (@ICC) February 23, 2025
मोहम्मद रिझवानने 46 धावा केल्या, पण इतक्या धावा करण्यासाठी त्याला 77 चेंडू लागले. टी-20 क्रिकेटच्या या युगात रिझवानची 59.74 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी पाकिस्तानी संघासाठी ओझे ठरली आहे. याच कारणामुळे भारतीय संघ या सामन्यात पुनरागमन करू शकला. खुशदिल शाहने पुन्हा एकदा 38 धावांची महत्त्वाची खेळी केली.
पांड्या अन् कुलदीपचा कहर
भारतीय संघासाठी मधल्या षटकांमध्ये कुलदीप यादवने वर्चस्व गाजवले. यादवने 9 षटकांच्या स्पेलमध्ये 40 धावा देत 3 विकेट घेतल्या. त्याने प्रथम फॉर्ममध्ये असलेल्या सलमान आगाची विकेट घेतली, जो फक्त 19 धावा करून बाद झाला. त्याने शाहीन आफ्रिदीलाही गोल्डन डकवर बाद केले आणि कुलदीपने नसीम शाहचा तिसरा बळी घेतला, ज्याने 14 धावा केल्या. त्याच्याशिवाय भारताकडून हार्दिक पंड्याने दोन विकेट घेतल्या. तर हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
