एक्स्प्लोर

नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली

Kishori Pednekar on Neelam Gorhe : आजपर्यंत महापौरपर्यंत गेलो पण आमचा पेढाही उद्धव ठाकरे यांनी घेतला नाही, ही बाई पिऊन बसली होती का? अशी विचारणा किशोरी पेडणेकर यांनी केली.

Kishori Pednekar on Neelam Gorhe : शिवसेनेमध्ये तीन वेळा आमदार आणि दोन वेळा उपसभापती होऊन सुद्धा शिवसेना शिंदे गटामध्ये गेलेल्या नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय रणकंदन सुरु झालं आहे. पदांच्या बदल्यात मर्सिडीज द्यावी लागत होती असं गोऱ्हे यांनी वक्तव्य केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून ठाकरी शैलीमध्येच समाचार घेण्यात आला आहे. मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाचा नेत्या किशोरी पेडणेकर यांनी अक्षरशः मातोश्रीवरील कुंडलिकच बाहेर काढत ही नालायक बाई म्हणत जोरदार प्रहार केला. आजपर्यंत महापौरपर्यंत गेलो पण आमचा पेढाही उद्धव ठाकरे यांनी घेतला नाही, ही बाई पिऊन बसली होती का? अशी विचारणा किशोरी पेडणेकर यांनी केली. या बाईला साहित्यिक परिषदेत कोणी भांडायला लावलं? कोणाची सुपारी घेतली? अशी विचारणा त्यांनी केली. 

नाव गोऱ्हे असले तरी काम काळे

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की ती माझी सहकारी कधीच नव्हती, नाव गोऱ्हे असले तरी काम काळे आहे. स्वतःला हुशार समजणारी ही बाई काय वेळ न बघता बरळल्याचा हल्लाबोल पेडणेकर यांनी केला. पेडणेकर पुढे म्हणाल्या की तीन वेळा आमदार दोन वेळा उपसभापती झालेल्या या बाईने किती मर्सिडीज दिल्या आणि कोणाला दिल्या हे सांगावं. तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला गेला तर साहित्यिकांच्या कार्यक्रमाला गेला. समाजाला दिशा देणारी माणसं म्हणजे साहित्यिक असतात. मात्र, बाई जाऊन बरळल्याचे पेडणेकर म्हणाल्या. या नालायक बाईला काय म्हणायचं असा हल्लाबोल सुद्धा किशोरी पेडणेकर यांनी केला.

सतत मातोश्रीवर बसलेली असायची आणि बोलायची थांबावं लागेल

त्या पुढे म्हणाल्या की, मुळात एक नंबरची ही खोटारडी बाई आहे. शिव्या घालायच्या लायकीची नाही. सतत मातोश्रीवर बसलेली असायची आणि सतत बोलायची थांबावं लागेल, तू होतीस कोण आणि तू करतेस काय? असा प्रहारही त्यांनी केला. महिला आघाडी वाढवण्यासाठी कधीच काही केलं नाही. किशोरी पेडणेकर आपल्या कार्यक्रमाचा एक साडीचा किस्सा सांगितला. पेडणेकर म्हणाल्या की मी एका कार्यक्रमासाठी बोलावलं तर माझ्याकडे साडी मागितली. मी दिली तर मला ती परत केली. मला ही साडी पाहिजे, अशी साडी पाहिजे असं सगळं होतं अशी टीका त्यांनी केली. बाळासाहेब साहित्यिकांना मान द्यायचे, तीच धुरा उद्धव साहेबांनी वाढवण्याचे काम केल्याचे पेडणेकर म्हणाल्या. 

इतर महत्वाच्या बातम्या 

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Indigo Flight : इंडिगो कधी सावरणार? प्रवास सुरळीत कधी होणार? Special Report
Nagpur Commissioner Name Plate : पगारावर समाधानी, अधिकारी अभिमानी Special Report
Ladki Bahin Yojana Politics : लाडकी बहीण वरून टोले, मुख्यमंत्री फडणवीसांचे शोले Special Report
Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget