एक्स्प्लोर
Photo : रंगाच्या शिंपणाने रंगून गेला भक्तगण, पुरंदर वीर येथील यात्रेची सांगता
Shreenath Mhaskoba Mandir Yatra : पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरीदेवीच्या यात्रेची रविवारी सांगता करण्यात आली.

Veer Mhaskoba Yatra 2025
1/7

'नाथ साहेबाचं चांगभलं' 'सवाई सर्जाचं चांगभलं ' असा जयघोष करत आणि रंगाची शिंपण करत वीर येथील यात्रेची सांगता झाली.
2/7

पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरीदेवीच्या यात्रेची रविवारी सांगता करण्यात आली.
3/7

ही यात्रा मागील तेरा दिवसापासून सुरू होती. मारामारी अर्थात रंगाचे शिंपण करून या यात्रेची सांगता करण्यात आली.
4/7

रविवारी दुपारी देवाच्या अंगावर रंगाचे शिंपण करण्यात आलं आणि यानंतर तोच रंग भाविक भक्तांच्या अंगावर टाकण्यात आला.
5/7

या रंगांच्या उधळणीला मारामारी असेदेखील म्हटले जाते.
6/7

मागील तेरा दिवसापासून वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवीचा यात्रा उत्सव सुरू होता.
7/7

रविवारी या यात्रेचा शेवटचा दिवस होता. त्या निमित्ताने वीर येथे हजारोंच्या संख्येने भाविक या यात्रा उत्सवात सहभागी झाले होते.
Published at : 23 Feb 2025 07:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion