पतीचे विवाहबाह्यसंबध, पत्नीने डिव्होर्स मागितला, नवऱ्याने चेहऱ्यावर अॅसिड फेकलं, मुंबईतील धक्कादायक घटना
महिलेच्या चेहऱ्यावर अॅसीड फेकल्याने चेहऱ्यावर जखमा झाल्या. पीडित कुटुंबीयांच्या घरात ॲसिड फेकल्यानंतर पतीने हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.
![पतीचे विवाहबाह्यसंबध, पत्नीने डिव्होर्स मागितला, नवऱ्याने चेहऱ्यावर अॅसिड फेकलं, मुंबईतील धक्कादायक घटना Husband extramarital affair wife asked for divorce acid attack Mumbai Malad Maharashtra News पतीचे विवाहबाह्यसंबध, पत्नीने डिव्होर्स मागितला, नवऱ्याने चेहऱ्यावर अॅसिड फेकलं, मुंबईतील धक्कादायक घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/27/b81c55d167ce1dd351982c1394bc7e49172742167707089_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मालवणी येथे 34 वर्षीय व्यक्तीने पत्नीच्या चेहऱ्यावर ॲसिड (Acid Attack) फेकल्याचा प्रकार समोर आला आहे.. या हल्ल्यानंतर जखमी महिलेला (27 ) यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून पतीला अटक केली आहे. पतीच्या विवाहबाह्य संबंधातून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जखमी महिलेचा 2019 मध्ये प्रेमविवाह झाला होता. पती बेरोजगार असून तो अंमलीपदार्थाचे व्यसन करत असल्याचे महिलेला समजले. तसेच पतीचे एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे महिलेला समजले होते. त्यामुळे तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि माहेरी निघून गेली.
अॅसीड फेकल्याने चेहऱ्यावर जखमा
पीडित महिला मागील तीन महिन्यांपासून मालाडमध्ये आपल्या आईकडे माहेरी राहत होती. बुधवारी सकाळी पती महिलेच्या आईच्या घरी आला. आईच्या घरी आल्यानंतर त्याने महिलेच्या चेहऱ्यावर अॅसीड फेकले. महिलेच्या चेहऱ्यावर अॅसीड फेकल्याने चेहऱ्यावर जखमा झाल्या. पीडित कुटुंबीयांच्या घरात ॲसिड फेकल्यानंतर पतीने हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. अचानक ॲसिड हल्ला झाल्याने घरातील कुटुंबीयांनी मोठ्याने आरडाओरड केली. जोरदार ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर महिलेच्या आईने तातडीने पीडित महिलेला कूपर रुग्णालयात दाखल केले .
पतीला अटक
दरम्यान, अॅसिड हल्ल्याची घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे व असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पतीविरुध्द गुन्हा दाखल केला. महिलेच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पतीच्या विरोधात कलम 124(2), 311, 333 आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पतीला अटक केले .
हे ही वाचा :
शौचालयात सुटे पैसे नसल्याचं सांगताच बेदम मारहाण, चेहऱ्यावर अॅसिड टाकलं; बदलापूर रेल्वे स्थानकावरील घटना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)