एक्स्प्लोर
भिवंडीच्या कोनगाव खाडीवर परदेशी पाहुण्यांची वर्दळ; अमेरिका अन् युरोपमधून आले सीगल पक्षी ठरताय आकर्षणाचा केंद्रबिंदू
Bhiwandi News: भिवंडीच्या कोनगाव खाडीवर परदेशी पाहुण्यांची सध्या वर्दळ बघायला मिळत आहे. यात अमेरिका अन् युरोपमधून आलेले सीगल पक्षी आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरतायत

Bhiwandi News
1/6

भिवंडीच्या कोनगाव खाडीवर सध्या परदेशी पाहुण्यांची वर्दळ वाढली आहे. यात अमेरिका आणि युरोपमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेले सीगल पक्षी येथे विसावले आहेत.
2/6

या पक्ष्यांचे मोहक रूप पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सीगल पक्ष्यांचा पांढरा शुभ्र रंग, पंखांवरील करडा छटा, लालसर काळी चोच आणि काळेभोर डोळे या वैशिष्ट्यांमुळे ते विशेष लक्ष वेधून घेतात.
3/6

हे पक्षी पाण्यात विहार करताना जणू मोत्यांची माळच पाण्यात अंथरल्याचा भास होतो. त्यामुळे अनेक लोक या पक्ष्यांना कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी खाडीवर पोहोचत आहेत.
4/6

सीगल पक्ष्यांचे मुख्य खाद्य छोटे मासे आणि खेकडे असले तरी आता त्यांना शेव, चिवडा आणि कुरकुरे खाण्याची सवय लागली आहे.
5/6

नागरिकांनी खाडीच्या पुलावर येताच हे पक्षी उत्साहाने पुलाजवळ येऊन मनमोकळ्या वातावरणात फोटोसेशनसाठी सज्ज होतात.
6/6

सीगल पक्ष्यांच्या या हिवाळी आगमनामुळे कोनगाव खाडीवर एक वेगळाच उत्साह संचारला असून, पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी हा एक विशेष आनंददायी अनुभव ठरत आहे.
Published at : 16 Feb 2025 07:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
क्राईम
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
