एक्स्प्लोर

सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ

राज्य सरकारच्या निर्देशानंतर मुंबई पोलिस आयुक्त व आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मिठी नंदी कंत्राटसंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमण्यात आले आहे.

मुंबई : राज्यात एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात राजकीय महाभारत सुरू असून आगामी महापालिका (BMC) निवडणुकांसाठी दोन्ही पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. ठाकरेंच्या ताब्यात असलेली मुंबई महापालिका महायुतीच्या ताब्यात घेण्यासाठी भाजप-शिवसेना प्रयत्नशील आहे. सध्या मुंबईतील नगरसेवकांना आपल्या बाजुने करण्यासाठी शिंदेंची शिवसेना आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी कोविड काळातील खिचडी घोटाळ्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) नेते सूरज चव्हाण तुरुंगात होते. आता, मिठी नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणातील गैरव्यवहाराचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. मिठी नदीच्या गाळ उपसण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विधान परिषदेत भाजप नेते प्रवीण दरेकर व आमदार प्रसाद लाड यांनी केला होता. त्यानुसार, राज्य सरकारने या प्रकरणी SIT स्थापन करून चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. 

राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या निर्देशानंतर मुंबई पोलिस आयुक्त व आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमण्यात आले आहे. त्यामुळे, आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेना ठाकरे गटाचं वर्चस्व असून यंदाच्या निवडणुकीत भाजपने मुंबई महापालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मिठी नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणाऱ्या गैरव्यवहारात कंत्राट कोणाला दिली, किती पैसे कुठे खर्च करण्यात आले, 2005 ते 2023 पर्यंत किती गाळ काढण्यात आला, किती सौंदर्यीकरण करण्यात आले? या सर्व कामाची चौकशी एसआयटीमार्फत केली जाईल. आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी सध्या 3 कंत्राटदारांना समन्स देखील बजावले आहे.

3 कंपन्यांना दिले कंत्राट

मनीष कासलीवाला - कैलास कंस्ट्रक्शन, रिषभ जैन- एक्यूब डिझाईन आणि शिरीष राठोड-मनदिप इंटरप्राईजेस अशी चौकशीला बोलवण्यात आलेल्या कंत्राटदरांची नावे आहेत. या तीन कंत्राटदारांना अंदाजे प्रत्येकी 30 ते 40 कोटींचं कंत्राट देण्यात आलं होतं. मिठी नदी ही प्रामुख्याने 11.84 किलोमीटर ही पालिकेकडे तर 6.8 किमी क्षेत्र हे MMRDA च्या हद्दीतून जाते. दोघांची कंत्राट देण्याची पद्धतही वेगवेगळी असल्याने दोन्हीही आस्थापनांना या प्रकरणी संबधित गैरव्यवहाराबाबत कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. महापालिकेकडून मात्र अपुरे कागदपत्र सादर करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, याआधी आर्थिक गुन्हे शाखेने खिचडी घोटाळा, डेडबॉडी बॅग घोटाळा आणि ऑक्सिजन प्लॉट प्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा

उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का, 5 नगरसेवकांनी साथ सोडली; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule and Prajakt Tanpure: प्राजक्त तनपुरे फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'शक्य असेल...'
प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'शक्य असेल...'
Amol Mitkari: अजित दादांच्या तपासाला दिरंगाई का? मुख्यमंत्र्यांनाच विचारलं पाहिजे, अमोल मिटकरींचा सरकारला घराचा आहेर, तर रोहित पवारांचा थेट इशारा, म्हणाले 10 मेपर्यंत....
अजित दादांच्या तपासाला दिरंगाई का? मुख्यमंत्र्यांनाच विचारलं पाहिजे, अमोल मिटकरींचा सरकारला घराचा आहेर, तर रोहित पवारांचा थेट इशारा, म्हणाले 10 मेपर्यंत....
Supriya Sule and Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अभ्यासू अन् हुशार नेते, पण महिला आरक्षणाबाबत दिल्लीतून प्रेशर आलं असेल: सुप्रिया सुळे
देवेंद्र फडणवीस अभ्यासू अन् हुशार नेते, पण महिला आरक्षणाबाबत दिल्लीतून प्रेशर आलं असेल: सुप्रिया सुळे
Ameet Satam BMC Fund Allocation: BMC च्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची चर्चा; अमित साटम यांनी 4 दिवसांआधीचं पत्र काढलं, काय म्हणाले?
BMC च्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची चर्चा; अमित साटम यांनी 4 दिवसांआधीचं पत्र काढलं, काय म्हणाले?

व्हिडीओ

Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्या बसचा भीषण अपघात; 20 ठार 30 जखमी, प्रशासन घटनास्थळी
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्या बसचा भीषण अपघात; 20 ठार 30 जखमी, प्रशासन घटनास्थळी
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
Ameet Satam BMC Fund Allocation: BMC च्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची चर्चा; अमित साटम यांनी 4 दिवसांआधीचं पत्र काढलं, काय म्हणाले?
BMC च्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची चर्चा; अमित साटम यांनी 4 दिवसांआधीचं पत्र काढलं, काय म्हणाले?
'भाजप संपवायला निघालेले मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नकोत' आमदार शिवाजी पाटलांची चंद्रकांतदादांसमोर भूमिका; मूश्रीफ सुद्धा बोलले, दिवसभरातील हायहोल्टेज बैठकांमध्ये काय काय घडलं?
'भाजप संपवायला निघालेले मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नकोत' आमदार शिवाजी पाटलांची चंद्रकांतदादांसमोर भूमिका; मूश्रीफ सुद्धा बोलले, दिवसभरातील हायहोल्टेज बैठकांमध्ये काय काय घडलं?
IPL 2026: सचिन, सेहवाग, धोनीसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं नेमकं काय घडलं?
सचिन, सेहवाग, धोनीसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं नेमकं काय घडलं?
Supriya Sule and Prajakt Tanpure: प्राजक्त तनपुरे फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'शक्य असेल...'
प्राजक्त तनपुरे फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'शक्य असेल...'
Rashid Khan: 'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
Kolhapur Crime: ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
Embed widget