एक्स्प्लोर

Delta Plus : डेल्टा प्लस विषाणूबाबत गैरसमज, घाबरण्याची गरज नाही, CSIRचे प्रमुख डॉ शेखर मांडे यांचं मत

संशोधनात कुठेच डेल्टा प्लस प्रकारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे कुठलेच पुरावे मिळालेले नाही. त्यामुळे नागरिकांनी या विषाणूच्या नवीन प्रकाराला घेऊन घाबरण्याची अजिबात गरज नाही, असं मत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर)  प्रमुख डॉ. शेखर मांडे यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना व्यक्त केले. 

Delta plus Update : डेल्टा प्लस या कोरोनाच्या विषाणूच्या प्रकाराला घेऊन संपूर्ण देशात आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रात उलट सुलट चर्चा सुरु आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात सध्याच्या घडीला फक्त 20 रुग्ण या विषाणूच्या प्रकाराने बाधित आहे. सध्या देश पातळीवर या कोरोनाच्या नवीन प्रकारच्या अनुषंगाने जोरदार संशोधन सुरु आहे, मात्र संशोधनात कुठेच डेल्टा प्लस या प्रकारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे कुठलेच  पुरावे मिळालेले नाही. त्यामुळे नागरिकांनी या विषाणूच्या नवीन प्रकाराला घेऊन घाबरण्याची अजिबात गरज नाही. शिवाय महामारीच्या काळात संसर्गच्या लाटा येत असतात. पण तिसरी लाट केव्हा येईल ते आताच सांगता येत नाही, त्या लाटेची तीव्रता कमी ठेवायची जबाबदारी ही नागरिकांच्या हातात असल्याचे मत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर)  प्रमुख डॉ. शेखर मांडे यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना व्यक्त केले. 

डेल्टा प्लस बाधित 21 रुग्णांपैकी एकानेच घेतला होता डोस

दुसरी लाट ओसरत असतानाच वैद्यकीय क्षेत्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या सर्व प्रकारात डेल्टा प्लस विषाणूने चिंतेत भर टाकली आहे. जगात सध्या सर्वात जास्त चिंता डेल्टा विषाणूबाबत व्यक्त केली जात आहे. त्याच्याच परावर्तित प्रकाराचे म्हणजे डेल्टा प्लसचे 21 रुग्ण राज्यात आहेत. त्यापैकी सर्वात अधिक रुग्ण रत्नागिरी, जळगाव, येथे असून काही रुग्ण मुंबई, ठाणे, रायगड परिसरात आहे.

Covid Delta Plus Variant: कोरोनाचा नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट काय आहे? त्याची नवीन लक्षणे जाणून घ्या

याबाबत अधिक माहिती देताना डॉ मांडे यांनी सांगितले की, "डेल्टा प्लस या विषाणूच्या प्रकाराला घेऊन जी चिंता व्यक्त केली जात आहे. त्याबद्दल खूप गैरसमज निर्माण केले जात आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने या विषाणूच्या प्रकाराला घेऊन संशोधन केले आहे. त्यामध्ये कुठेही असे पुरावे आढळले नाही कि हा विषाणू घातक आहे किंवा त्याचा संसर्गाचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे लोकांनी अजिबात घाबरण्याची गरज नाही. दुसरे म्हणजे डेल्टा हा विषाणू सध्या भारतभर आहे. तिसरी लाट केव्हा माहीत नाही मात्र त्याची तीव्रता कमी करण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. कोरोनाच्या अनुषंगाने जर सुरक्षित वावर ठेवला आणि लसीकरण करून घेतले तर तिसरी लाट गंभीर असण्याची शक्यता फार कमी आहे. "    

Delta Variant : 'डेल्टा'चा धोका आणि तिसऱ्या लाटेचा इशारा,महाराष्ट्रातील 31जिल्हे पुन्हा तिसऱ्या गटात

डेल्टा प्लस रुग्णांची लक्षणे ही सर्वसाधारण कोरोनाची लक्षणे असतात त्याप्रमाणेच असतात. या विषाणूचा प्रादुर्भाव किती गंभीर आहे, याबाबत अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे.  या विषाणूचा फैलाव किती राहील हे आताच सांगणे मुश्किल आहे. ह्या नवीन विषाणूचे वर्तन कसे असेल याबाबत आता कुणीच काही सांगू शकत नाही. विषाणूचे परावर्तित होणे म्हणजे नेमके काय होते हे जाणून घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय तज्ञांचे मते, हे यापूर्वीच्या साथीच्या आजारात दिसून आले आहे कि, प्रत्येक विषाणूं हा आपले अस्तित्व टिकवून ठेवत असतो. याकरिता तो स्वतःच्या रूपामध्ये बदल करून घेत असतो. कोरोनाच्या या काळातच ब्राझील स्ट्रेन , यु के स्ट्रेन , दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेन  बघितले आहे. भविष्यात असे आणखी विषाणूचे प्रकार येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विषाणूचे बदल होत जाणे ही एक प्रक्रिया आहे आणि याचे ज्ञान वैद्यकीय जगताला अवगत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget