Vishwanath Mahadeshwar : शिक्षण समितीचे अध्यक्ष ते महापौर.. विश्वनाथ महाडेश्वर यांची कारकीर्द
विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते आणि स्थायी समितीचे ते सदस्य होते. जाणून घेऊया विश्वनाथ महाडेश्वर यांचा राजकीय प्रवास आहे

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर विश्वनाथ महाडेश्वर पुन्हा चर्चेत आले आहे. शिक्षण समितीचे अध्यक्ष ते महानगरपालिकेचे महापौर असा विश्वनाथ महाडेश्वर यांचा प्रवास आहे. विश्वनाथ महाडेश्वर प्रवास कसा होता ते जाणून घेऊया.
विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते आणि स्थायी समितीचे ते सदस्य होते
- 2002 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून निवड
- 2003 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून निवड
- 2007 : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले
- 2012 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले
- 2017 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड
2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला होता. सेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांची बंडखोरी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्या होत्या
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेनं आमदार तृप्ती सावंत यांना डावलून मुंबईचे विद्यमान महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. त्या विरोधात सावंत यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला होता. शिवसेनेकडून त्यांची समजूत घालण्यात आली. मात्र, त्यांनी माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळं मतांची विभागणी होऊन काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दिकी यांना लॉटरी लागली.
झिशान सिद्दिकी हे माजी आमदार बाबा सिद्दिकी यांचे चिरंजीव आहेत. वांद्रे पश्चिमचे आमदार राहिलेल्या बाबा सिद्दिकी यांनी यावेळी निवडणूक न लढता मुलाला वांद्रे पूर्वमधून उभे केले होते. त्यांना शिवसेनेतील बंडखोरीचा फायदा झाला. सिद्दिकी यांना 38,309 मते मिळाली. तर, विश्वनाथ महाडेश्वर यांना 32, 476 मते मिळाली. बंडखोर सावंत यांनी तब्बल 24 हजार 34 मते घेतली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
