एक्स्प्लोर

विद्यार्थ्यांना दिलासा, अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता अन्य परीक्षा होणार नाही!

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. अंतिम सत्राची परीक्षा सोडून इतर परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना आतापर्यंतच्या आधीच्या गुणांच्या परफॉर्मन्सवर पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

मुंबई : अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा सोडून इतर परीक्षा होणार नाही, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. तसंच युजीसीच्या निर्देशांनुसारच सगळे निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. "अंतिम सत्राची परीक्षा सोडून इतर परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना आतापर्यंतच्या आधीच्या गुणांच्या परफॉर्मन्सवर पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय "घेण्यात आला आहे. यामध्ये पूर्वीच्या वर्षाचा परफॉर्मन्स 50 टक्के गृहीत धरलं जाईल आणि सध्याचा परफॉर्मन्स 50 टक्के ग्राह्य धरला जाईल. त्यानुसार ग्रेड दिले जातील आणि पुढच्या वर्गात पाठवलं जाईल," असं उदय सामंत यांनी सांगितलं.

ज्याला परफॉर्मन्सवर दिलेले ग्रेड कमी वाटत असतील त्याला पुढच्या वर्गात गेल्यावर ऐच्छिक परीक्षा देत येणार आहे. त्याचं वेळापत्रक विद्यापीठ ठरवेल, अशी माहितीही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. "जे विद्यार्थी ग्रेडिंग देताना नापास झाले आहेत, त्यांचे नेमकं काय करायचं हा प्रश्न सुद्धा आहे. त्यामुळे जे विद्यार्थी ग्रेडिंगमध्ये नापास होतील, त्या विषयाच्या परीक्षा पुढच्या वर्षात प्रवेश देऊन घेतल्या जातील. विद्यापीठ याबाबतचं वेळापत्रक जाहीर करेल," असं त्यांनी सांगितलं.

एटीकेटीच्या परीक्षा 120 दिवसांच्या आत! "एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाईल. मात्र प्रवेश दिल्यानंतर ज्या विषयाच्या एटीकेटी लागलेल्या आहेत त्या विषयाच्या परीक्षा 120 दिवसाच्या आत घेतल्या जातील," असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

....तर पुन्हा बैठक घेऊन निर्णय! "अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या 1 जुलै ते 30 जुलै दरम्यान घ्याव्या लागतील. मात्र, दुर्दैवाने जर लॉकडाऊन सुरु राहिला तर 20 ते 25 जून दरम्यान पुन्हा एकदा समिती आणि सरकार याबाबत बैठक घेऊन निर्णय घेईल," असंही उदय सामंत यांनी सांगितलं.

सोशल डिन्सन्सिंग ठेवूनच परीक्षा "बीए, बीकॉम, बीएससी, बीबीए, इंजिनियर, आर्किटेक्टचर, एमसीए, डिप्लोमा, एमए, एमकॉम, एमएस्सी यासारख्या सर्व परीक्षांच्या अंतिम वर्षच्या शेवटच्या सत्राची परीक्षा घेतल्या जाणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच परीक्षा होणार आहेत. प्रॅक्टिकल घेता आले नाही तर जर्नल सबमिशन केलेले आहेत. ऑनलाईन तोंडी परीक्षा घेतली जाईल. अशा पद्धतीने प्रॅक्टिकल घेऊ," असं उदय सांमत म्हणाले.

सीईटी परीक्षेबाबत येत्या आठ दिवसात योग्य तो निर्णय घेऊ असं उदय सामंत यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "यूजीच्या सीईटी 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान परीक्षा आणि पीजीच्या सीईटी परीक्षा 23 जुलै ते 30 जुलै याचं नियोजन आम्ही सध्या करत आहोत."

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा, सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर तटकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा, सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर तटकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
Anil Patil : गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी कर्तव्यात कसूर करून गोपनीयतेचा भंग केलाय; सर्वप्रथम त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे; आमदार अनिल पाटील यांची मागणी, म्हणाले....
गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी कर्तव्यात कसूर करून गोपनीयतेचा भंग केलाय; सर्वप्रथम त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे; आमदार अनिल पाटील यांची मागणी, म्हणाले....

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
Hardik Pandya : हार्दिक पांड्याची पंजाब किंग्जमध्ये दाखल होताच पहिली पोस्ट, हार्दिक नव्या टीमच्या कर्णधाराचं नाव जाहीर करत म्हणाला...
हार्दिक पांड्या पंजाबमध्ये दाखल, पहिल्याच सोशल मीडिया पोस्टमध्ये पंजाबच्या चाहत्यांची मनं जिंकली
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
अँटॉप हिलमधील हिंदूंचे फ्लॅट बांगलादेशींना दिले; म्हाडाचे 110 फ्लॅट बळकावल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
अँटॉप हिलमधील हिंदूंचे फ्लॅट बांगलादेशींना दिले; म्हाडाचे 110 फ्लॅट बळकावल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
Ravindra Dhangekar: महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
अजित दादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं; अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं
अजित दादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं; अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं
Embed widget