एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये आणि पत्रकारिता क्षेत्रात गेली अकरा वर्षापासून कार्यरत आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये सध्या "मुंबई ब्युरो चीफ" या पदावर कार्यरत आहे. या मागील अकरा वर्षाच्या कार्यकाळात राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध प्रश्न आपल्या बातमीद्वारे महाराष्ट्रतल्या जनतेसमोर मांडत आहे.
प्रत्येक विषयाची, बातमीची योग्य पद्धतीने मांडणी करून आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्या बातमीची छाप कशी पडेल आणि लोकांपर्यंत ती सहज त्यांना समजेल अशा भाषेत कशी जाईल यासाठी प्रयत्नशील आहे.
छत्रपती संभाजी नगर हे मूळ गाव असून पहिली ते पदवीच शिक्षण करून पुणे विद्यापीठातून मास्टर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (MCA) पूर्ण करत पदव्युत्तर शिक्षण घेतल. पदव्युत्तर शिक्षण आयटी क्षेत्रात घेतल्यानंतर आपल्या आवडीच्या पत्रकारिता क्षेत्रात मुंबईच्या झेवीयर्स महाविद्यालयामध्ये पत्रकारिता डिप्लोमा कोर्स आणि त्यानंतर पत्रकारितेत सुद्धा एम ए (मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ) छत्रपती संभाजी नगर -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा विद्यापीठातून पूर्ण केला
एबीपी माझामध्ये 2016 पासून काम करत आहे. 2019,2024 लोकसभा विधानसभा निवडणुका, पक्ष फुटी पासून ते सत्तांतराच्या बातम्या अगदी जवळून कव्हर केल्या, शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचा गोंधळ, विद्यार्थी शिक्षकांचे प्रश्न, शिक्षण क्षेत्रातल्या रोजच्या घडामोडी इथपासून ते शिक्षक विद्यार्थी आंदोलनतले प्रश्न, दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेलं विद्यार्थ्यांचा आंदोलन असे अनेक विद्यार्थ्यांच्या युवांच्या निगडित घडामोडी, त्यांचे प्रश्न मांडण्याचे काम करत आहे
विधानसभा निवडणुकीत 'पोस्टमन माझा' सारखा 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या करेक्टर रिपोर्टिंगद्वारे विविध मतदार संघातील मतदारांचे प्रश्न स्थानिक आमदार, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मांडले. महानिर्वाणदिनी भीमगीत गायिका सुषमादेवी यांचा काळाच्या पडद्याआड गेलेला बुलंद आवाज महाराष्ट्रसमोर आणला.
कोरोना काळात शोध पत्रकारितेतून कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत "ऑपरेशन लुटारू" या स्टिंग ऑपरेशनच्या मालिकेतून बेड पासून रुग्णवाहिकेसाठी, कोरोना टेस्टसाठी कशी लूट केली जाते अश्या अनेक गोष्टी सरकार समोर मांडल्या.
आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल खालील पुरस्कार प्रदान करण्यात आले
राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र शासन पु.ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार -2019
ईएनबीए राष्ट्रीय पुरस्कार 2019
राज्यस्तरीय युवा पत्रकार संघ पुरस्कार 2024
सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार 2026
सन्मान देवदूतांचा पुरस्कार 2021
श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019
चौथा स्तंभ राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार 2019
श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019