Congress Foundation Day : नागपुरातील काँग्रेसच्या महारॅलीला सोनिया आणि प्रियांका गांधींची अनुपस्थिती
सोनिया गांधी यांची प्रकृती बरी नसल्यानं सभेला येणार नसल्याची माहिती आली आहे. राहुल गांधी 1 वाजता तर मल्लिकार्जुन खरगे साडे बारा वाजता नागपूरमध्ये दाखल होणार आहे.
नागपूर : नागपुरात (Nagpur News) आज काँग्रेसच्या (Congress) 'तय्यार है हम' (Hain Taiyar Hum) महारॅलीचं आयोजन करण्यात आलंय. या सभेसाठी देशभरातील काँग्रेसचे नेते नागपुरात येत आहेत. मात्र सोनिया (Soniya Gandhi) आणि प्रियंका गांधीची (Priyanka Gandhi) या सभेला येणार नसल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. तर राहुल गांधी देखील खराब हवामानामुळे एक तास उशीरा नागपूरमध्ये दाखल होणार आहे.
नागपुरात आज काँग्रेसच्या महारॅलीचं आयोजन करण्यात आलंय. या सभेसाठी देशभरातील काँग्रेसचे नेते नागपुरात येत आहेत. त्या निमित्ताने या सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सोनिया गांधी यांची प्रकृती बरी नसल्यानं सभेला येणार नसल्याची माहिती आली आहे. राहुल गांधी 1 वाजता तर मल्लिकार्जुन खरगे साडे बारा वाजता नागपूरमध्ये दाखल होणार आहे.
काँग्रेस पक्षाच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त आज नागपुरात काँग्रेसची "है तैयार हम" महारॅली होणार आहे. महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठीचे रणशिंग फुंकणार आहे. सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी तसेच काँग्रेसशासित राज्यातील किमान तीन मुख्यमंत्री तसंच काँग्रेस कार्यसमितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी 3 वाजता महारॅली सुरु होणार आहे.
खोटी माहिती देण्यात भाजप एक्सपर्ट : नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, आम्ही रामाच्या नावाने धर्माच्या नावाने पैसा गोळा करत नाही काँग्रेसनं इंग्रजांच्या विरोधातली लढाई देशातील जनतेकडून पैसा घेऊन प्रामाणिकपणे लढली. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं देश अडचणीत आहे सर्वांचा योगदान काँग्रेससोबत असायला पाहिजे या भूमिकेने पैसे गोळा केले जात आहे. आम्ही मिस कॉल देऊन जगातील मोठी पार्टी असण्याचा दावा करत नाही. भाजपने राम मंदिराच्या पैशाचा हिशोब शोध द्यावा काँग्रेस पक्ष चांगलं करायला गेलं तर त्याच्यावर टीका होते. फडणवीस आकडेवारी सांगण्यात एक्सपर्ट आहे. खोटी माहिती देण्यात ते एक्सपर्ट आहे आपल्या नागपूरचे असल्यामुळे आपल्याला माहिती आहे खोटं बोला पण रेटून बोला भाजपची भूमिका आहे. नागपूरमध्ये झालेल्या स्फोटात महिला आणि लहान मुलांचे जे तुकडे झाले त्याचे देखील फडणवीस यांनी समर्थन केलं. देशात बेरोजगारी उद्योग किती कमी झाले याची आकडेवारी फडणवीस यांनी जाहीर करावी खोटे बोलून तरुणांच्या जखमेवर मीठ चोळू नका.