मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धारावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
आज हलाल या शब्दाचा अर्थ लॉ फूल आहे, त्याला एक सायंटीफीक बेस आहे. हलाल मीठ म्हणजे कायदेशीररित्या पशुबळी दिल्यानंतर त्याचं रक्त वाहून देण्यासाठी हे मीठ वापरलं जातं.

मुंबई : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्याने पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार मात्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे. मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मांस (Meat) खरेदी करू नका, असे आवाहन देखील नितेश राणेंनी केले आहे. त्यामुळे, राणेंच्या वक्तव्याने पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम वाद निर्माण होत आहे. त्यातच, राणेंच्या भूमिकेवर आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी संताप व्यक्त केला. तसेच, महाराष्ट्रात जातीय द्वेषातून विभाजन केलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय. झटका मटणावरुन वेगळा वाद घालावा तसं नाही, मटण स्विकारताना विविध पार्टनुसार आपण ते घेतो निवडून घेतो, त्यात ही असं करणार होतो तर मच्छी कशी कापणार, असा सवालही आव्हाडांनी उपस्थित केला.
आज हलाल या शब्दाचा अर्थ लॉ फूल आहे, त्याला एक सायंटीफीक बेस आहे. हलाल मीठ म्हणजे कायदेशीररित्या पशुबळी दिल्यानंतर त्याचं रक्त वाहून देण्यासाठी हे मीठ वापरलं जातं. हे पशुबळी साधारण हलाल पद्धतीने तो खाटीक देतो, परंपरेने हा वाद कधी झालेला दिसला नाही. मात्र, आपल्याला हे नवीन वाद उकरून काढत आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी झटका मटण वादावरुन तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. झटका मटणावरुन वेगळा वाद घालावा तसं नाही, मटण स्विकारताना विविध पार्टनुसार आपण ते घेतो निवडून घेतो, त्यात ही असं करणार होतो तर मच्छी कशी कापणार, काय लावलंयं या महाराष्ट्रात? असा सवाल आव्हाड यांनी मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यावरुन उपस्थित केला आहे.
नवीन नवीन वाद लावले जात आहेत, या आदी कसाई व खाटिक हे गावाबाहेर एकत्र दुकान लावायचे. सर्व काही सुरळीत सुरू असताना आग लावायची गरज काय, महाराष्ट्रात जातीय द्वेषातून विभाजन केलं जात आहे. यात मरण हे दरदिवशी कमवणाऱ्या व्यक्तीचं आहे, त्याचं काय असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. याची वैज्ञानिक बाजूही समजून घ्या, कोणी काय खावं हे सांगणारे तुम्ही कोण? मी मटण खायला जात नाही. मात्र, आता जाईन तेव्हा मला वाटेल तिथून घेईन, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.
मल्हार सर्टिफिकेट हे सरकारचे धोरण आहे का?
मला हे कळत नाही की तुम्ही नितेश राणे यांच्या वक्तव्याला एवढं महत्त्व का देता? ज्याला मल्हार पाहिजे जो मल्हार खाईल, ज्याला हलाल खायचा तो हलाल खाईल, असे समाजवादी पक्षाच नेते आणि आमदार रईस शेख यांनी म्हटलं आहे. आता हिंदू खाटीक यांना सर्टिफिकेट मिळणार हे काही सरकारचा धोरण आहे का हे त्यांनी स्पष्ट करावं, असा सवाल देखील त्यांनी महायुती सरकारला विचारला आहे. तसेच, ज्याला मटण हिंदूकडून घ्यायचं तो हिंदूकडून घेईल, ज्याला मुस्लिमकडून घ्यायचं तो मुस्लिमकडून घेईल. राज्य सरकारने असा कुठलाही नियम केलेला नाही, नितेश राणे असे वक्तव्य करत राहतात, अशी प्रतिक्रिया रईस शेख यांनी खटका मटण आणि मल्हार सर्टीफिकेट संदर्भाने दिली.
दरम्यान, नितेश राणेंच्या या आवाहनावर विरोधी बाकांवरच्या नेत्यांनी जोरदार टीकेची झोड उठवली. आता मंत्र्यांनी आम्हाला आम्ही कोणत्या दुकानातून मटण घ्यायचं ते सांगायचं का असा सवालच विरोधकांनी विचारला आहे.
What Is Halal Meat : हलाल मटण म्हणजे काय?
- इस्लाममध्ये फक्त हलाल मांसाला परवानगी.
- इस्लामनुसार फक्त वैध मार्गाने कत्तल केलेले प्राणी खाऊ शकतात.
- चाकूने जनावराच्या मानेची नस आणि श्वासोच्छवासाची नळी कापली जाते.
- यावेळी प्रार्थना देखील केली जाते.
- संपूर्ण रक्त बाहेर पडण्याची वाट पाहिली जाते.
- ज्यासाठी प्राणी जिवंत आणि निरोगी असणे देखील आवश्यक.
What Is Jhatka Meat : झटका मटण म्हणजे काय?
- धारदार शस्त्राने प्राण्याची मान एका झटक्यात धडापासून वेगळी करणे.
- झटक्यामुळे प्राण्याला प्राण्याला जास्त वेदना होत नाहीत असा समज आहे.


















