Bal Sahitya Puraskar : साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा; संगीता बर्वे यांना 'पियूची वही' कादंबरीसाठी पुरस्कार
Bal Sahitya Puraskar : प्रसिध्द लेखिका संगीता बर्वे यांना 'पियूची वही' या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा 'साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार' आज जाहीर झाला आहे.

Bal Sahitya Puraskar : देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नाव लौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने बाल साहित्य पुरस्कारांची (Bal Sahitya Puraskar) आज घोषणा केली आहे. यात प्रसिध्द लेखिका संगीता बर्वे यांना 'पियूची वही' या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा 'साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार' आज जाहीर झाला आहे.
अकादमीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 22 प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारांची निवड व घोषणा करण्यात आली आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या संगीता बर्वे या उत्तम कवयित्री आणि बाललेखिका आहेत. 'मृगतृष्णा' आणि 'दिवसाच्या वाटेवरून' हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिध्द आहेत. 'गंमत झाली भारी', 'झाडआजोबा', 'खारुताई आणि सावली', 'उजेडाचा गाव' हे त्यांचे मुलांसाठीचे कवितासंग्रह असून 'पियूची वही' ही कांदबरी विशेष प्रसिध्द आहे.
‘पियूची वही’ नक्की काय?
रोजनिशी लिहीण्यासाठी रोज काहीतरी लिहिण्यासारखे केले पाहिजे या प्रेरणेतून पीयू नावाच्या मुलीला निसर्गातील वेगवेगळया गोष्टींची होणारी ओळख हे ‘पियूची वही’ या कादंबरीचा विषय आहे. पीयू नावाची एक छोटी मुलगी रोजनिशी लिहिण्यासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून सुटीच्या दिवशी खिडकी रंगवायला घेते. त्यातून तिला तिचे जग आणि निसर्ग सापडतो. निसर्ग आणि निसर्गातील विविध घटकांच्या ओढीने पीयू आपले अनुभव लिहू लागली.
बाल साहित्य पुरस्कारांमध्ये कोकणी भाषेसाठी लेखिका ज्योती कुंकळकर यांच्या ‘मयुरी’ या कादंबरीस बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
संबंधित बातम्या
OTT Release This Week : 'दिल्ली क्राइम 2' ते 'क्रिमिनल जस्टिस 3' 'या' आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार अॅक्शनचा तडका
Shivpratap Garudjhep : शिवरायांच्या आग्रा भेटीचा थरार, विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘शिवप्रताप गरुडझेप’!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
