
Anil Deshmukh : आधी टीका अन् आता विनंती; शरद पवार छगन भुजबळांच्या भेटीवरुन माजी गृहमंत्र्यांचा खरपूस समाचार, म्हणाले..
एकीकडे टीका करायची, अन दुसरीकडे आज पवार साहेबांच्या घरी जाऊन राज्य शासनाच्या वतीने त्यांना विनंती करायची. हा दुटप्पी प्रकार असल्याचे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बोलताना व्यक्त केले आहे.

Nagpur News नागपूर : एकीकडे बारामतीत जाऊन राजकीय भाषण करायचं आणि त्यामधून टीका करायची, अन दुसरीकडे आज पवार साहेबांच्या (Sharad Pawar) घरी जाऊन राज्य शासनाच्या वतीने त्यांना विनंती करायची. तुम्ही वर्षभर काय भाष्य केले, काय काय चर्चा तुमच्यात झाली, हे सांगायला हवं होतं. विधानसभेत सरसकट सर्व राजकीय भाषणे केलीत. त्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सर्व नेत्यांनी राजकीय भाषणे झालेत. मात्र दुसरीकडेच शरद पवार बैठकीला आले नाही, याचा कांगावा केला गेला.
आमची कायम आणि आजही हीच मागणी राहिली आहे की वर्षभरात तुम्ही काय चर्चा केली, हे आम्हालाही कळले पाहिजे. परंतु याबाबत कोणीही सांगायला तयार नाही. त्यामुळे एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे सरकारची झालेली कोंडी सोडवता येत नसल्याने शरद पवारांकडे विनंती करायची, हा दुटप्पी प्रकार असल्याचे मत राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी बोलताना व्यक्त केले आहे.
कुठल्याही परिस्थितीत पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनी कितीही चाचपणी केली अथवा परतीचा प्रयत्न केला, तरीही पक्षात त्यांना परत स्थान नाही, ही आमच्या पक्षाची भूमिका असल्याचेही अनिल देशमुख म्हणाले. ते नागपूर (Nagpur News) येथे बोलत होते.
जोपर्यंत ज्याची चलती, तोपर्यंत भाजप त्याचा फायदा घेतो- अनिल देशमुख
जोपर्यंत ज्याची चलती असते तोपर्यंत भाजप त्याचा फायदा घेत असते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या कमी जागा आल्यामुळे आपल्याला फायदा ऐवजी नुकसानच झाल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे ते कुठल्याही पक्षाला बाजू करायच्या मनस्थितीत आहे. वेळप्रसंगी ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही वेगळे वेगळे लढण्याचे सांगू शकतात. सध्या वेगळे स्वतंत्र लढा आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पुढे काय करायचं ते बघू, असेही ते सांगतील. भाजपचा काही भरोसा नाही, असे आमचे मत नाही तर सत्तेत असलेल्या अनेक आमदारांमध्ये चर्चा असल्याचे मोठे विधानही अनिल देशमुख यांनी केले आहे.
सिल्व्हर ओकवरील भेटीत कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
गरिबांची घरं पेटता कामा नये. एकमेकांच्या जीवावर कोणी उठता कामा नये. हाच माझा हेतू आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. शरद पवारही म्हणाले की, आम्ही याच्यात राजकारण आणणार नाही. केवळ एक सामाजिक प्रश्न म्हणून दोन-चार लोकांबरोबर चर्चा करून काय मार्ग काढायचा हे बघुया, असे मला शरद पवार यांनी सांगितले.
राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत राज्यातील एक ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही शांततेसाठी काम केलं पाहिजे, असं मी त्यांना सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की जरांगे हे मुख्यमंत्र्यांशी भेटले. पण मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं हे आम्हाला माहिती नाही. तुम्ही ओबीसी नेत्यांच्या भेटीला गेले होते तुम्ही त्यांना काय आश्वासन दिलं, हे मला माहिती नाही. तुम्ही याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे, अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे.
संबधित बातम्या -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
