एक्स्प्लोर

24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..' परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..

Parbhani Violance: कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. शांतता राखा, असे आवाहन  ॲड. आंबेडकर यांनी आंबेडकरी समाजाला केले आहे. यावर त्यांनी ट्वीट केलं आहे.

Prakash Abedkar On Parbhani Violance: परभणीत मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या 24 तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. तसेच ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असल्याचेही म्हटले आहे.

ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोचले. त्यांनी केलेल्या निषेध आणि निदर्शनामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून  एका समाजकंटकाला अटक केली आहे. तरीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. शांतता राखा, असे आवाहन  ॲड. आंबेडकर यांनी आंबेडकरी समाजाला केले आहे. यावर त्यांनी ट्वीट केलं आहे.

 

परभणी बंदला हिंसक वळण

परभणीतील  संविधानपुस्तिकेच्या विटंबनेनंतर आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती.या हाकेला हिंसक वळण लागलं असून आंदोलकांनी बंद दुकानावर दगडफेक केली आहे. तसेच पोलिसांच्या गाड्यांवरही  दगडफेक करण्यात आलीय काही गाड्यांची मोडतोडही आंदोलकांकडून करण्यात आली. यानंतर आता पोलिसांनी ॲक्शन मोडवर आल्याचं दिसून आलंय. पोलिसांनीही या आंदोलकांवर सोम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळालं असून शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, परभणीतील या घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला इशारा दिला असून येत्या 24 तासात सर्व हल्लेखोरांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराच दिलाय.

आंदोलकांनी पाईप पेटवले, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

परभणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकेच्या विटंबण्याच्या प्रकरणात आज परभणी बंद करण्यात आले होते या बंदला हिंसक वळण लागले.आंदोलन करत असलेल्या काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड केलीये पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आता परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरामधील व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीव्हीसी पाईप पेटवून देण्यात आला असून या पाईपला मोठ्या प्रमाणावर आग लागली आहे. पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आलीय. काही गाड्यांची मोडतोडही आंदोलकांकडून करण्यात आली यानंतर आता पोलिसांनी ॲक्शन मोडवर आल्याचा दिसून येते पोलिसांनीही या आंदोलकांवर सोम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळाले तसेच शहरांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
NCP Sharad Pawar MP Meets Narendra Modi Delhi: देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची सगळ्यांचीच इच्छा, जयंत पाटलांच्या मनात योग्य विचार येतील, मंत्री नितेश राणेंचं सूचक वक्तव्य 
मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची सगळ्यांचीच इच्छा, जयंत पाटलांच्या मनात योग्य विचार येतील, मंत्री नितेश राणेंचं सूचक वक्तव्य 

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Embed widget