एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal: शरद पवारांच्या बिछान्याशेजारी खुर्ची टाकून मराठा- ओबीसी आरक्षणावर चर्चा, भुजबळांनी सांगितली खोलीतील Inside स्टोरी

छगन भुजबळ अचानक शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर गेले. तासभर ताटकळत ठेवल्यानंतर दीड तास पवारांशी चर्चा झाली. या भेटीत काय घडलं या विषयी छगन भुजबळांनी माहिती दिली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP Ajit Pawar Camp)  गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar)  यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. छगन भुजबळ हे आज सकाळी अचानक शरद पवारांच्या भेटीला गेले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली.  छगन भुजबळांनी शरद पवारांशी तब्बल दीड तास चर्चा केली. छगन भुजबळांनी शरद पवारांशी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली.  

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले? 

छगन भुजबळ म्हणाले,  मी आज शरद पवार यांच्याकडे गेलो होतो. मी त्यांना भेटण्यासाठी वेळ घेतली नव्हती. त्यांना भेटायला गेलो होतो, पण ते झोपलेले होते. म्हणून मी एक ते दीड तास थांबलो. उठल्यानंतर त्यांनी मला बोलावलं. आम्ही जवळपास दीड तास चर्चा केली. मी त्यांना सांगितलं मी काय कुठलं राजकारण घेऊन गेलेलो नाही. मी मंत्री, आमदार म्हणून आलेलो नाही. पण महाराष्ट्रात सध्या ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं. पण आता राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत. काही लोक ओबीसी, धनगर समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत. सध्या राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत राज्यातील एक ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही शांततेसाठी काम केलं पाहिजे, असं मी त्यांना सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की जरांगे हे मुख्यमंत्र्यांशी  भेटले. पण मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं हे आम्हाला माहिती नाही. तुम्ही ओबीसी नेत्यांच्या भेटीला गेले होते तुम्ही त्यांना काय आश्वासन दिलं, हे मला माहिती नाही. तुम्ही याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे, अशी मागणी  छगन भुजबळांनी केली आहे.  

आरक्षणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, शरद पवारांचे भुजबळांना आश्वासन

मी त्यांना म्हणालो की, तुम्ही राज्यातील सर्वांत ज्येष्ठ नेते आहात. राज्यातील परिस्थितीचा तुम्हाला सर्वाधिक अभ्यास आहे. आम्ही मंत्री झालो म्हणजे आम्हाला याचा खूप अभ्यास आहे, असं समजायचं कारण नाही. ते म्हणाले की बरोबर आहे. पण तुमची अगोदर काय चर्चा झाली हे आम्हाला माहितीच नाही. मग मी म्हणालो की तुम्ही आम्हाला बोलवा. आम्ही तुमच्याकडे येतो. शरद पवार म्हणाले की मी एक-दोन दिवसांत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो. आम्ही दोन-चार लोकं एकत्र बसतो. काय झालं, काय होतंय, काय करायला पाहिजे यावर चर्चा करू. मी तयार आहे. माझी प्रकृती बरी नाही. पण दोन दिवसांत आपण यावर चर्चा करू.

आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण नको : छगन भुजबळ

गरिबांची घरं पेटता कामा नये. एकमेकांच्या जीवावर कोणी उठता कामा नये. हाच माझा हेतू आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. शरद पवारही म्हणाले की, आम्ही याच्यात राजकारण आणणार नाही. केवळ एक सामाजिक प्रश्न म्हणून दोन-चार लोकांबरोबर चर्चा करून काय मार्ग काढायचा हे बघुया, असे मला शरद पवार यांनी सांगितले. 

शरद पवारांना भेटण्याआधी प्रफुल्ल पटेलांशी चर्चा केली : छगन भुजबळ

मला राजकारणाची, आमदारकीची तसेच मंत्रिपदाचीही चर्चा नाही. गोरगरिबांमध्ये दुफळी निर्माण होऊ नये, हाच माझा उद्देश आहे. त्यासाठी मी कोणालाही भेटायला तयार आहे. कोणालाही विनंती करायला मला थोडाही कमीपणा वाटणार नाही. मी फक्त घरून निघताना प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा केली होती. मी शरद पवार यांना भेटायला जात आहे. माझ्याजवळ असलेली कागदपत्रे त्यांना देणार आहे, असे मी त्यांना सांगितले होते. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी मला जा असं सांगितलं, असे छगन भुजबळ  म्हणाले. 

Chhagan Bhujbal Press Conference Video: तर मी उद्या राहुल गांधींना देखील भेटू शकतो: छगन भुजबळ  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Director Rob Reiner Wife Murder Case: सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
Embed widget