Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर मनपा घरफाळा घोटाळ्यात फिर्यादीच निघाला आरोपी; 46 लाखांचे नुकसान केल्याचा आरोप
Kolhapur : कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा गैरव्यवहारातील मूळ फिर्यादीच आरोपी निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनपाचा तत्कालीन करनिर्धारक संजय भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे.
Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा गैरव्यवहारातील मूळ फिर्यादीच आरोपी निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनपाचा तत्कालीन करनिर्धारक संजय भोसलेला (वय 51, रा. 43 ई, भोसलेवाडी, कोल्हापूर) पोलिसांनी अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले असता 6 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज (23 फेब्रुवारी) जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 जून 2020 ला गैरव्यवहाराची फिर्याद भोसलेनं दिली होती. मात्र, आता 46 लाख 23 हजार 30 रुपयांचे महापालिकेचे नुकसान केल्याचा आरोप असल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तत्कालिन तत्कालीन करनिर्धारक आणि फिर्यादी संजय भोसलेला चौकशीसाठी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर अटक करून राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
नेमका काय प्रकार घडला?
कोल्हापूर मनपाच्या घरफाळा विभागात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर एप्रिल 2020 मध्ये तत्कालीन आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी यांनी याबाबत त्रिसदस्यीस सदस्य समिती नेमली होती. याबाबतचा जून 2020 मध्ये अहवाल समोर रोजी मिळाला. त्यावेळी करनिर्धारक म्हणून संजय भोसले होते. त्यांनी सुमारे 3 कोटी 14 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक केली, नंतर त्यांना जामीन मिळाला. यापैकी एक अनिरुद्ध शेट यांचे निधन झाले. त्यानंतर पुन्हा तत्कालीन उपमहापौर भूपाल शेटे यांनी याबाबत चौकशीची मागणी करत उपोषण देखील केले. अखेर आयुक्त तथा प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी चौकशी समिती नेमली. याचा अहवाल आयुक्तांना आणि कारवाईसाठी पोलिसांना देण्यात आला. करनिर्धारक आणि संग्राहक सुधाकर चल्लवाड यांनी 7 नोव्हेंबर 2022 रोजी हा अहवाल पोलीस ठाण्यात सादर केला. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या