बायकोचा प्रियकरासोबत राहण्यासाठी तगादा, TCS मॅनेजरनं लाईव्ह व्हिडिओ करत आयुष्य संपवलं; आता बायको व्हिडिओ रिलीज करत म्हणाली, 'तो माझा प्रियकर होता, पण...'
आग्रा येथील मानव शर्मा याने 24 फेब्रुवारी रोजी पत्नीसोबतच्या तणावामुळे आत्महत्या केली होती. मानवने त्याच्या पत्नीवर अफेअर असल्याचा आरोप केला होता आणि त्याचा व्हिडिओही रेकॉर्ड केला होता.

Agra TCS Manager Manav Sharma : आग्रा येथील टीसीएस मॅनेजर मानव शर्माने बायकोने लग्नानंतर एका वर्षातच प्रियकरासोबत राहण्यासाठी तगादा लावल्यानंतर लाईव्ह व्हिडिओ करत आत्महत्या केली. आता बहीण आकांक्षा शर्माने मानव शर्माने कोणत्या कारणामुळे आणि परिस्थितीत आत्महत्या केली याबद्दल खुलासा केला आहे. आकांक्षाने सांगितले की मानवला त्याच्या पत्नीच्या अफेअरबद्दल माहिती मिळाली होती, त्यानंतर तो घटस्फोटाची याचिका दाखल करणार होता. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आकांक्षा शर्माने खुलासा केला की, “मानव विवाह तुटल्यामुळे आणि घटस्फोटाबाबतच्या कायदेशीर अडथळ्यांमुळे खूप अस्वस्थ होता. यावर्षी जानेवारीमध्ये त्याला त्याच्या पत्नीच्या अफेअरची माहिती मिळाली, त्यानंतर तो परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार होता, मात्र घटस्फोट घेणे सोपे नसल्याचे त्याला सांगण्यात आले. त्याने निकिताला तिच्या अफेअरमुळे मारले नाही तर घटस्फोट घेणे सोपे नाही आणि सर्व कायदे महिलांच्या बाजूने आहेत याची जाणीव करून दिली.
'निकिता आणि तिच्या बहिणी विवाहित पुरुषांना अडकवायचे'
आकांक्षा म्हणाली की, “प्रिया नावाच्या महिलेने इन्स्टा मेसेज करून मानवला त्याची पत्नी निकिता आणि दोन बहिणींबद्दल सांगितले होते. प्रियाने आरोप केला आहे की, तिन्ही बहिणी विवाहित पुरुषांना फसवून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. ही बाब लक्षात आल्यानंतर मानवने जानेवारी महिन्यात आत्महत्येचा प्रयत्नही केला होता, मात्र त्याचे आई-वडील मुंबईत आले आणि त्यांनी दोघांनाही समजावून सांगितले, त्यानंतर तो बचावला. आकांक्षाने सांगितले की, दोघांनी परस्पर सहमतीनंतर घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला होता.
पण प्रियकरासोबत सेक्सही केला याची माहिती दिली नव्हती
दरम्यान, पहिल्यांदा निकिताने मानव मारहाण करत असल्याचा आरोप केला होता. तसेच लग्नापूर्वी प्रियकर होता. तो माझा भूतकाळ होता आणि माझा आता त्याच्याशी संबंध नसल्याचे म्हटले होते. मात्र, आता मानवच्या आत्महत्येनंतर प्रकरण अंगलट येणार असे दिसू लागल्याने निकिता शर्माचे कुटुंबीय फरार असल्याची चर्चा आहे. कायदेशीर अडचण समोर दिसू लागताच आता निकिताने पुन्हा एकदा नवा व्हिडिओ रिलीज केला असून त्यामध्ये आता मानवला अफेअरची माहिती दिली होती असे म्हटले आहे. निकिता म्हणते की, मी अभिषेकसोबत अफेअरची माहिती दिली होती, पण प्रियकरासोबत सेक्सही केला याची माहिती दिली नव्हती. अनेकवेळा विचारल्यानंतर मी अफेअरची माहिती दिली. तो आयुष्यात आल्यानंतर मी सर्व संपर्क तोडले होते. मी आयुष्यात अनेक चुका केल्या आहेत. मानवने कोणताही त्रास दिला नाही. मी खूप चुका केल्या आहेत. त्याने विचारूनही मी माहिती दिली नाही.
आगरा (उत्तर प्रदेश) में मानव शर्मा की आत्महत्या का मामला
— Madan Mohan Soni - (आगरा वासी) (@madanjournalist) March 1, 2025
वीडियो में निकिता के हाव-भाव देखकर ऐसा लग रहा है कि यह स्क्रिप्टेड है और किसी और के द्वारा शूट किया जा रहा है।
वीडियो में निकिता कह रही हैं कि उन्होंने मानव से कई झूठ बोले हैं और पहले भी कई गलत काम किए हैं। उन्होंने यह भी… pic.twitter.com/s2a1wFJttD
मानवलाही धमकावण्यात आले
आकांक्षा म्हणाली की मानवला धमकी देण्यात आली की जर त्याने निकितापासून वेगळे होण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या कुटुंबाला खूप पश्चात्ताप करावा लागेल कारण कायदा महिलांच्या बाजूने आहे. यानंतर मानव आणि त्याची पत्नी निकिता 23 फेब्रुवारी रोजी मुंबईहून आग्रा येथे परतले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घटस्फोटासाठी वकिलाला भेटणार होते.
वकिलाला भेटण्यापूर्वी मानवने निकिताच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती
वकिलाला भेटण्यापूर्वी निकिता मानवला आग्रा येथील बर्हान येथे घेऊन गेली होती, जिथे त्याचे आई-वडील राहतात. आकांक्षाने सांगितल्यानुसार, तिथेही मानवला धमकावले गेले आणि ताकीद दिली गेली की पुरुषाला घटस्फोट घेणे खूप कठीण आहे. मृत्यूच्या एक दिवस आधी मानवने आपल्या वडिलांना सांगितले होते की, निकिताने आपल्याला घटस्फोट घेणे खूप कठीण जाईल असे वारंवार सांगितले होते.
‘मानव अतिशय संवेदनशील होता’
जेव्हा निकिताला विचारण्यात आले की मानव तिला मारहाण करायचा का? उत्तरात निकिता म्हणाली की मानव हा खूप संवेदनशील होता, तो एक कलाकार होता, त्याला चित्रकला आणि गिटार वाजवण्याची आवड होती. तो कधीही कोणाला दुखवू शकत नव्हता. ज्याला स्वतःचा जीव घ्यायचा आहे, त्याच्यावर इतरांना दुखावल्याचा आरोप कसा करता येईल?
24 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली
आग्रा येथील मानव शर्मा याने 24 फेब्रुवारी रोजी पत्नीसोबतच्या तणावामुळे आत्महत्या केली होती. मानवने त्याच्या पत्नीवर अफेअर असल्याचा आरोप केला होता आणि त्याचा व्हिडिओही रेकॉर्ड केला होता. याप्रकरणी मानवच्या वडिलांच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे, मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या























