Uttarakhand Avalanche : उत्तराखंड हिमस्खलनात 50 मजुरांना बाहेर काढले, 4 जणांचा मृत्यू, पाच जणांचा अजूनही शोध सुरू; जखमींच्या डोक्याला गंभीर इजा
Uttarakhand Avalanche : बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (बीआरओ) 55 कामगार मोळी-बद्रीनाथ महामार्गावर एका कंटेनरच्या घरात थांबले असताना ग्लेशियर कोसळले. त्याचा फटका सर्व कामगारांना बसला.

Uttarakhand Avalanche : उत्तराखंडमधील चमोली हिमस्खलनात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 17 मजुरांची सुटका करण्यात आली. याआधी शुक्रवारी 33 जणांची सुटका करण्यात आली होती. यातील 4 गंभीर जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 5 मजूर अद्याप बेपत्ता आहेत. काल 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.15 वाजता चमोली येथील माना गावाजवळ हा अपघात झाला. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (बीआरओ) 55 कामगार मोळी-बद्रीनाथ महामार्गावर एका कंटेनरच्या घरात थांबले असताना ग्लेशियर कोसळले. त्याचा फटका सर्व कामगारांना बसला. लष्कराच्या 4 हेलिकॉप्टरशिवाय ITBP, BRO, SDRF आणि NDRF चे 200 हून अधिक जवान बचावकार्यात गुंतले आहेत.
#WATCH Uttarakhand: Indo-Tibetan Border Police (ITBP) personnel carrying out rescue operations in avalanche-hit area of Chamoli district.
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 1, 2025
4 people have died in the avalanche incident.
(Source: ITBP) pic.twitter.com/frrVj3pY5p
माना हे तिबेट सीमेवरील भारतातील शेवटचे गाव
अडकलेल्या 55 मजुरांमध्ये बिहारमधील 11, उत्तर प्रदेशातील 11, उत्तराखंडमधील 11, हिमाचल प्रदेशातील 7, जम्मू-काश्मीरमधील 1 आणि पंजाबमधील 1 मजुरांचा समावेश आहे. 13 मजुरांचा पत्ता व मोबाईल क्रमांक नाही. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज सकाळी घटनास्थळी जाऊन कामगारांची भेट घेतली. याआधी पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बचाव कार्याचा आढावा घेतला.
जखमींच्या डोक्याला गंभीर दुखापत
आयटीबीपीचे कमांडंट विजय कुमार पी यांनी सांगितले की, कामगारांची प्रकृती चिंताजनक होती, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. 25 हून अधिक जखमींना जोशीमठ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गुदमरल्यासारखे आणि हायपोथर्मिया फ्रॅक्चरची शक्यता
बर्फात गाडलेले कामगार किती दिवस जिवंत राहणार हा मोठा प्रश्न आहे. चीफ कन्सल्टंट सर्जन राजीव शर्मा यांनी सांगितले की, बर्फात गाडल्यामुळे गुदमरून मृत्यू होतो. हायपोथर्मिया फ्रॅक्चरमुळे मृत्यू देखील होतो. जास्त काळ बर्फात गाडले गेल्याने मृत्यू होऊ शकतो.
हिमाचलमध्ये 583 रस्ते, 5 राष्ट्रीय महामार्ग बंद
दरम्यान, उत्तरेकडील राज्यांमध्ये डोंगराळ भागात मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे. पुढील आठवड्यात पाऊस आणि हिमवर्षाव सुरू राहण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशातील काही भागात 2 फुटांपेक्षा जास्त बर्फवृष्टी झाली आहे. राज्यातील 583 रस्ते आणि 5 राष्ट्रीय महामार्ग बंद आहेत. जम्मू-काश्मीरमध्येही बर्फवृष्टी झाली. खराब हवामानामुळे जम्मू-काश्मीर सरकारने शाळांमधील हिवाळी सुट्टी सहा दिवसांनी वाढवली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























