एक्स्प्लोर
PM नरेंद्र मोदींकडून बारामतीचा पुन्हा खास उल्लेख; शरद पवारांची आठवण सांगत सुप्रिया सुळेंनी मानले आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा बारामतीच्या शेती उद्योगावर भाष्य केलं आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबद्दल पंतप्रधान मोदींचे विशेष आभार मानले.
Supriya sule thanks to narendra modi for baramati
1/8

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा बारामतीच्या शेती उद्योगावर भाष्य केलं आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबद्दल पंतप्रधान मोदींचे विशेष आभार मानले, तसेच समाधान वाटते, असेही म्हटल आहे.
2/8

आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदरच्या अंजीराची दखल माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी भाषणादरम्यान घेतली. ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
3/8

पुरंदरच्या अंजीरांनी अल्पावधीतच आपल्या अद्वितीय गुणवत्तेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले वेगळे स्थान निर्माण केले. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आवर्जून पुरंदरच्या अंजीराची दखल घेतली याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
4/8

पुरंदरच्या अंजीराची प्रधानमंत्री महोदयांना दखल घ्यावीशी वाटली या यशामागे अंजीराच्या शेतीत काबाडकष्ट करणारा शेतकरी आणि फळबागेचे धोरण दूरदृष्टीने राबविणारे आदरणीय पवार साहेब आहेत याचे विशेष समाधान वाटते.
5/8

पुरंदर आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अपार मेहनतीला यानिमित्ताने सलाम. येथील अंजीराची किर्ती देशविदेशात वृद्धिंगत होत राहो हीच सदिच्छा, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
6/8

जो शेतकरी कधीकाळी लोकल मार्केटमध्येच आपला माल विकायचा, लोकल बाजारापर्यंतच मर्यादीत होता, तो आता जगभर आपल्या शेतीमालाची विक्री करतो.
7/8

पुलवामा की स्नो पीक, महाराष्ट्रातील पुरंदरचे अंजीर आणि काश्मीरच्या क्रिकेट बॅटची डिमांड आता जगभर होत आहे, असे मोदींनी आपल्या भाषणात उदाहरण देऊन म्हटले. मोदींनी यापूर्वी देखील बारामतीच्या विकासावर भाष्य करताना बारामतीचा उल्लेख केला होता.
8/8

राजधानी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचा विकास आणि जागतिक स्तरावर भारतीय वस्तू व शेती मालांना मिळणारी बाजारपेठा या अनुषंगान भाषण केलं
Published at : 01 Mar 2025 10:13 PM (IST)
आणखी पाहा






















