एक्स्प्लोर

... तर मढी गावाने जो निर्णय घेतलाय तो भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल; मंत्री नितेश राणेंचा बीडीओंनाही इशारा

पाथर्डी तालुक्यातील मढी येथील ग्रामसभेत मुस्लीम समाजाच्या व्यापार्‍यांना कानिफनाथ यात्रेत दुकाने लावण्यास बंदी करण्याचा ठराव करण्यात आला होता.

अहिल्यानगर : जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढीच्या जत्रेत मुस्लीम (Muslim) बांधवांना दुकाने लाऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. आता, राज्याचे मंत्री आणि हिंदुत्त्ववादी नेते म्हणून सातत्याने आपली व भाजपची भूमिका मांडणाऱ्या नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मढी गावातील ग्रामपंचायतीच्या ठरावाचं समर्थन केलं आहे. मढी गावाने जो निर्णय घेतला तो इतिहासात लिहिला जाईल, जिहाद्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम मढी गावाने केले. मढी गावातील कडवट विचाराचे हिंदू जागृत झाले. देशाला दिशा देणारा मढी गावाचा निर्णय आहे, अशा शब्दात मंत्री राणे यांनी मढी गावच्या ग्रामपंचायतीने संमत केलेल्या ठरावावर भाष्य केलं आहे. गटविकास अधिकाऱ्याला कळू द्या हे हिंदुत्ववादी सरकार आहे, असेही राणे यांनी म्हटले. दरम्यान, येथील मढी गावच्या यात्रेत मुस्लीम समाजाच्या व्यापाऱ्यांना दुकाने लावण्यास बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला होता. मात्र, येथील गटविकास अधिकाऱ्यांनी तो ठराव रद्द केल्याने नितेश राणे यांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांनाच इशारा दिला आहे. मढी गावात हिंदू धर्म सभेतून बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. 

पाथर्डी तालुक्यातील मढी येथील ग्रामसभेत मुस्लीम समाजाच्या व्यापार्‍यांना कानिफनाथ यात्रेत दुकाने लावण्यास बंदी करण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यानंतर ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच, राज्यातही या ठरावाची चर्चा होऊन विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले. दरम्यान, गटविकास अधिकार्‍यांकडून मढीच्या ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर, पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी वरिष्ठांना चौकशी अहवाल पाठवला असून मुस्लीम व्यावसायिकांना बंदी केल्याचा ठराव रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यातच, आज अहिल्यानगर दौऱ्यावर असलेल्या मंत्री नितेश राणे यांनी या ठरावावर भाष्य करत बीडीओंना देखील इशारा दिला आहे. 
 
मढी गावाने जो निर्णय घेतला तो इतिहासात लिहिला जाईल, जिहाद्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम मढी गावाने केले. मढी गावातील कडवट विचाराचे हिंदू जागृत झाले. देशाला दिशा देणारा मढी गावाचा निर्णय आहे, अशा शब्दात मंत्री राणे यांनी मढी गावच्या ग्रामपंचायतीने संमत केलेल्या ठरावावर भाष्य केलं आहे. गटविकास अधिकाऱ्याला कळू द्या हे हिंदुत्ववादी सरकार आहे, असेही राणे यांनी म्हटले. आम्ही तुमच्या धर्माच्या विरोधात भूमिका घेतली तर तुम्हाला चालेल का?, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. रामगिरी महाराजांनी जर एखादी भूमिका घेतली तर तुम्हाला मिर्चा का झोबतात?. हिंदू धर्माला जर आव्हान देण्याचे काम केले तर मढी गावाने जो निर्णय घेतलाय तो निर्णय भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल. आम्ही आमदार, मंत्री झालो ते हिंदू जनतेने मतदान केले म्हणून झालोय. आता मोर्चे काढण्याची, आंदोलनांची गरज नाही. ते दिवस गेले, आता सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे, अशा शब्दात नितेश राणे यांनी विशिष्ट समाजाला उद्देशून भाष्य केलं. 

तुम्ही पु्न्हा ठराव करा, मी बीडीओचं बघतो

मढी गावचा ठराव जरी रद्द झाला तरी पुन्हा ठराव करा आणि सर्व ग्रामस्थांनी त्या ठरावावर सह्या करा. सर्व ग्रामस्थांनी ठरावावर सह्या केल्या की मी बघतो बीडीओ कसा ठराव रद्द करतो, असेही राणेंनी म्हटले. राज्यातील अनेक ठिकाणी या लोकांनी केलेले अतिक्रमण काढली जात आहेत. ज्या धर्मात मूर्तीपूजेला विरोध आहे, त्या लोकांना आपल्या यात्रेत दुकानं का लावून द्यावी? तुम्हाला जर आमच्या धार्मिक ठिकाणी येऊन जिहाद करायचा असेल तर आम्ही ते सहन करणार नाही, अशी भूमिका राणे यांनी येथील जाहीर भाषणातून व्यक्त केली. 

हेही वाचा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या रोहिंग्याना लॉजवर पकडलं तो लॉज नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांचा, विनायक राऊत यांचा गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Rajabhau Waje : '…अन् भर पत्रकार परिषदेत खासदार वाजेंच्या डोळ्यात आलं पाणी'; निष्ठेवरून संजय राऊतांकडून तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?
'…अन् भर पत्रकार परिषदेत खासदार वाजेंच्या डोळ्यात आलं पाणी'; निष्ठेवरून संजय राऊतांकडून तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?
Anjali Damania On Operation Tiger: एकनाथ शिंदेंचा वापर होतोय; 'ऑपरेशन टायगर' भाजपचंच षडयंत्र; 6 खासदारांपैकी एकाला मंत्रीपद अन् 100 कोटींची ऑफर; अंजली दमानियांचा दावा
एकनाथ शिंदेंचा वापर होतोय; 'ऑपरेशन टायगर' भाजपचंच षडयंत्र; 6 खासदारांपैकी एकाला मंत्रीपद अन् 100 कोटींची ऑफर; अंजली दमानियांचा दावा
Sanjay Raut : गुजरातचे दोन व्यापारी जोपर्यंत सत्तेत तोपर्यंत चोऱ्या-माऱ्या, लबाड्या होतच राहतील; ऑपरेशन टायगरवरुन संजय राऊतांची बोचरी टीका
गुजरातचे दोन व्यापारी जोपर्यंत सत्तेत तोपर्यंत चोऱ्या-माऱ्या, लबाड्या होतच राहतील; ऑपरेशन टायगरवरुन संजय राऊतांची बोचरी टीका
Operation Tiger UBT Shivsena: एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी, आता ठाकरेंची आमदारांबाबत धाकधूक वाढली, 20 आमदार कोण?
एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी, आता ठाकरेंची आमदारांबाबत धाकधूक वाढली, 20 आमदार कोण?

व्हिडीओ

Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Damania: 'एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर...अंजली दमनियांचा तीव्र संताप
'एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर...अंजली दमनियांचा तीव्र संताप
Kolhapur News: 'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'
'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'
Operation Tiger UBT Shivsena: एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी, आता ठाकरेंची आमदारांबाबत धाकधूक वाढली, 20 आमदार कोण?
एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी, आता ठाकरेंची आमदारांबाबत धाकधूक वाढली, 20 आमदार कोण?
Omraje Nimbalkar: पुण्यातून ओमराजेंच्या 'मातोश्री' म्हणाल्या; रात्री घरीच होते, सकाळी जीमला जातो म्हणून घराबाहेर गेले
पुण्यातून ओमराजेंच्या 'मातोश्री' म्हणाल्या; रात्री घरीच होते, सकाळी जीमला जातो म्हणून घराबाहेर गेले
खासदार फुटीनंतर गुवाहटीवरुन परतलेल्या ठाकरेंच्या निष्ठावंत आमदारांची प्रतिक्रिया, कैलास पाटील अन् नितीन देशमुख म्हणाले...
खासदार फुटीनंतर गुवाहटीवरुन परतलेल्या ठाकरेंच्या निष्ठावंत आमदारांची प्रतिक्रिया, कैलास पाटील अन् नितीन देशमुख म्हणाले...
Ravi Rana on Opearation Tiger UBT: सहा खासदार फुटताच रवी राणांनी उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले,
सहा खासदार फुटताच रवी राणांनी उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, "आणखी दोघे माझ्या संपर्कात"
Shivsena case in Supreme Court: गेली 3 वर्षे 10 महिने अन् 28 दिवसांपासून ठाकरेंची गल्ली ते दिल्ली न्यायासाठी फरफट; अजूनही तारीख पे तारीख सुरुच असताना पक्ष पुन्हा फोडला
गेली 3 वर्षे 10 महिने अन् 28 दिवसांपासून ठाकरेंची गल्ली ते दिल्ली न्यायासाठी फरफट; अजूनही तारीख पे तारीख सुरुच असताना पक्ष पुन्हा फोडला
OmRaje Nimbalkar: 'गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब' ओमराजे निंबाळकरांच्या फेसबूक पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंट्सचा पाऊस; शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण
'गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब' ओमराजे निंबाळकरांच्या फेसबूक पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंट्सचा पाऊस; शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण
Embed widget