Jalna Crime: जालन्यात खळबळ! प्रसिद्ध होलसेल कापड दुकानात धाडसी चोरी; 1 कोटी 70 लाखांची रोकड चोरीला
Jalna Crime News: जालना शहरातील प्रसिद्ध होलसेल कापड दुकान नथुमल वासुदेव दालनात आज धाडसी चोरी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
![Jalna Crime: जालन्यात खळबळ! प्रसिद्ध होलसेल कापड दुकानात धाडसी चोरी; 1 कोटी 70 लाखांची रोकड चोरीला Jalna Crime theft at a famous wholesale cloth shop in Jalana; 1 crore 70 lakh cash stolen Jalna Crime: जालन्यात खळबळ! प्रसिद्ध होलसेल कापड दुकानात धाडसी चोरी; 1 कोटी 70 लाखांची रोकड चोरीला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/26/9f3f9d70a890f9fb21751ec2a86b1ffd167207185297384_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jalna Crime News: जालना शहरात झालेल्या एका धाडसी चोरीच्या घटनेने शहर हादरलं आहे. शहरातील प्रसिद्ध होलसेल कापड दुकान नथुमल वासुदेव दालनात आज धाडसी चोरी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार 1 कोटी 70 लाखांची रोकड चोरीला गेली असल्याची माहिती समोर आली आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे घटनेचे गांभीर्य पाहता स्वतः पोलीस अधीक्षक यांनी देखील घटनास्थळची केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना शहरातील प्रसिद्ध होलसेल कापड दुकान नथुमल वासुदेव दालनात आज धाडसी चोरी उघडकीस आली आहे. या दुकानातून अज्ञात चोरट्यानी 1 कोटी 70 लाखांची रोकड पळवली आहे. तर चोरट्यांनी सीसीटीव्हीचा DVR देखील काढून नेला असल्याने आरोपींची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे पोलिसांकडून परिसरातील इतर सीसीटीव्ही तपासले जात आहे. मात्र या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली, व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बदुकान मालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, 23 ते 25 डिसेंबर दरम्यान दुकानात जमा झालेली रक्कम स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आली होती. दरम्यान आज सकाळी 10 वाजता दुकान उघडल्या नंतर दुकान मालक महेश नाथानी यांना हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे त्यांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली आहे. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळची पाहणी करत पंचनामा केला आहे. सोबतच डॉग स्कॉड आणि ठसे तज्ञ यांना देखील पाचारण करण्यात आले होते. तर पोलिसांनी या चोरी प्रकरणात पथक नेमले असून, स्थानिक गुन्हे शाखेकडून देखील अज्ञात चोरांचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षकांची पाहणी!
जालना शहरातील सुप्रसिद्ध कापड दुकानात झालेल्या चोरीच्या घटनेने जालना शहरात खळबळ उडाली आहे. यात 1 कोटी 70 लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहिली केली आहे. तसेच तपासाच्या दृष्टीने वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती करून सूचनाही केले आहे.
ही बातमी देखील वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)