मोठी बातमी : डान्सफ्लोअरवर चारपेक्षा जास्त बारबाला नको, नोटा उधळता येणार नाहीत, डान्सबारच्या नव्या कायद्याची चर्चा
Dance Bar : डान्सबार संदर्भात नवीन कायदा येत्या अधिवेशनात मांडला जाणार आहे. त्याला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळणार आहे.

Dance Bar : राज्याच्या मंत्रिमंडळाची आज मंगळवारी (दि. 18) बैठक पार पडणार असून यात विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत डान्सबार संदर्भात चर्चा होणार असून याबाबत नवीन कायदा येत्या अधिवेशनात मांडला जाणार आहे. या कायद्याला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
2005 साली आर. आर. पाटील यांनी डान्सबारला बंदी घातली होती. त्यानंतर डान्सबारचे मालक कोर्टात गेले होते. त्यानंतर एक प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने डान्सबारवरील बंदी उठवत अनेक नियम अटी लागू केल्या होत्या. होत्या. राज्य सरकारने 2016 साली महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ ऑब्सेन डान्स इन हॉटेल्स, रेस्तराँ अँड बार रूम्स अँड प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वुमन अॅक्ट 2016 हा नवा कायदा केला होता. या कायद्यात नव्या तरतुदी करण्यात येणार आहेत.
नव्या तरतुदी काय असणार?
- डान्सबारमध्ये नोटांची उधळण करता येणार नाही.
- डिस्को आणि ऑक्रेस्ट्रा संदर्भात राज्य सरकारची परवानगी संदर्भात ही बदल करण्यात येणार
- डान्सबार संदर्भात नियम आणि कायदा करताना समितीमध्ये डान्सबारचा प्रतिनिधी असावा
- डान्सबार फ्लोअरवर चारपेक्षा अधिक बारबाला नको
- बारबाला आणि ग्राहकांमध्ये किमान दोन मीटरचे अंतर असावे
- ग्राहकांना डान्स फ्लोअरवर जाता येणार नाही
- डान्सबारमध्ये धूम्रपानास मनाई
- बारबालांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे
- बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत
- गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था असावी
मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा
- कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर उर्जा प्रकल्प उभारणे तसेच योजनेची उर्जा व कार्यक्षमता सुधारण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत चर्चा होणार आहे.
- अंमली पदार्थ विरोधी टास्कफोर्स करता एकूण 346 नवीन पदे निर्माण करण्यास आणि त्याच्या खर्चास मान्यता देण्यावर चर्चेची शक्यता.
- महत्वाचे म्हणजे डान्स बारमधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत आणि त्यात काम करणाऱ्या महिलांची सुरक्षा करण्याबाबत अधिनियम 2016 मध्ये सुधारणा करण्याबाबत चर्चा
- सहावा राज्य वित्त आयोग स्थापनेवर चर्चा होणार.
- राज्यातील रोपवेंच्या कामासाठी तसेच राष्ट्रीय राज्यमार्ग लाॅजिस्टिक व्यवस्थापण NHLML ला जागा उपलब्ध करून देण्यावर चर्चा.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
