(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amalner Curfew : तरुणांच्या किरकोळ वादातून दगडफेक, अमळनेर शहरात दोन दिवस संचारबंदी लागू
Amalner Curfew : अमळनेर शहरात (Amalner) दगडफेक प्रकरणामुळे संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली आहे.
Amalner Curfew : सध्या राज्यातील अनेक भागात तणावाचे वातावरण असून आज वादग्रस्त प्रकरणामुळे धुळे (Dhule) शहरात देखील मोर्चा काढण्यात आला होता. अशातच अमळनेर शहरातील (Amalner) जिंजर गल्लीत काल रात्री दोन गटात हाणामारी होत दगडफेक झाली. याप्रकरणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अमळनेरात संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली आहे.
राज्यात वादग्रस्त पोस्टमुळे तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यावरून राज्यातील अनेक भागात आंदोलन (Protest) करण्यात येत आहेत. याच दरम्यान काल रात्रीच्या सुमारास अमळनेर (Amalner City) शहरात अल्पवयीन मुलांच्या किरकोळ भांडणातून सामाजिक तेढ निर्माण होऊन दगडफेक झाली. शांतताभंग होऊ नये व कायदा सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. अमळनेर शहरात 10 जून सकाळी 11.00 वाजल्यापासून ते 12 जून सकाळी 11.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आवश्यकता वाटल्यास संचारबंदीमध्ये वाढ करणेत्त येईल. अमळनेर शहरातील नागरिकांनी संचारबंदी काळात आपापल्या घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी कैलास कडलग यांनी केले
दरम्यान शहरातील एका भागात दोन तीन तरुणांमधे किरकोळ बाचाबाचीमधून हाणामारी झाली. यानंतर काही वेळात दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली. हा प्रकार अमळनेर शहरात दगडी गेट परिसरात जिंजर गल्लीसह गांधलीपुरा भागात घडली. यामध्ये काही वाहनांचे नुकसान झाले आहे. याबाबत पोलिसाना माहिती मिळताच पोलीस पथक पथक घटनास्थळी दाखल झाले, मात्र यात तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह तीन ते चार नागरिकही जखमी झाले आहे. घटनेनंतर काही वेळात पोलिसांची कुमक पोहोचताच परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या भागात मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून तणाव पूर्ण शांतता असल्याचं पाहायला मिळत आहे. या घटनेत पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या 32 तरुणांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात अटकेची कारवाई सुरू केली असून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
काय घडलं नेमकं?
दरम्यान, शुक्रवारी रोजी रात्री 9 वाजता सराफ गल्लीतील जिनगर गल्लीत दगडफेकीला सुरुवात झाली. काही समाजकंटकांनी दगडफेक केली, त्यामुळे दोन समाजातील लोकं आपसात भिडले व परस्परांवर दगडफेक करण्यात आली. लहान मुलांवरुन हा प्रकार घडल्याचे समजते. काल नऊ वाजेच्या सुमारास लहान मुलांवरुन झालेल्या वादाचे रुपांतर दगडफेकीत झाले. दगडफेक एवढी मात्र तरीही दगडफेक सुरुच होती. त्यानंतर सुभाष चौक, गांधलीपूरा आदी परिसरातही दगडफेक झाली. परिस्थितीचे गांभीर्य पाहता सहाय्य पोलिस अधिक्षक ऋषिकेश पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले.
सध्या परिस्थिती नियंत्रणात...
सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दंगलीचे नेमके कारण समजू शकले नाही. सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलिस दंगलीमागील संशयितांचा शोध घेत आहेत. उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांच्या आदेशाने कलम 144 अन्वये शहरात 10 जून सकाळी 11 वाजेपासून ते 12 जून रोजीच्या सकाळी 11 वाजेपर्यंत संचारबंदीचे अमळनेर शहरात शांतता व कायदा व परिस्थिती नियंत्रणात आणू लागले. सुमारे बारा वाजेपर्यंत हळुहळु सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आदेश लागू करण्यात आले आहेत.